कोरोना उद्रेकाच्या महत्त्वाच्या टप्प्यात राज्यातील जनतेला कोरोना स्थिती तसेच उपाययोजनांविषयी सतत जागरूक ठेवणारे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनाच कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी गुरुवारी रात्री ट्विट करीत आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपली प्रकृती चांगली असून डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपका&त आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ कारोना चाचणी करावी, असे म्हटले आहे. दरम्यान राज्यमंत्री बच्चू कडू यांना दुसऱयांदा कोरोनाची लागण झाली असून त्यांनीही ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे