बरुन सोबती आणि गिरीजा ओक ही जोडी प्रथमच ‘व्हेन अ मॅन लव्ह अ वुमन’ या लघुपटाद्वारे एकत्र आले आहेत. सई देवधर यांनी या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा लघुपट मारिया (गिरीजा) आणि पीटर (बरुन) या विवाहित जोडप्याभोवती फिरते. मारिया त्याला सकाळी उठवून खास दिवसासाठी तयार व्हायला सांगते. वरुण तयार होत असताना एका प्रेमळ पत्नीप्रमाणे त्याला मदत करते. पण बरुन संध्याकाळी घरी आल्यानंतर मात्र या गोष्टीला कमालीची कलाटणी मिळते.
गिरिजाने मारिया उत्तम साकारली आहे, तर शांत, समंजस आणि प्रेमळ पीटर बरुनने भन्नाट साकारला आहे. सईच्या दिग्दर्शनाने पटकथेत खास रंग भरले आहेत. हा आगळावेगळा लघुपट प्रेमात पडलेल्या प्रेक्षकांना नक्की आवडेल. यूट्युबवर तो पाहाता येईल.