हिंदीतील ‘बिग बॉस 7’ या शोमधील विजेतेपदामुळे प्रसिद्धाच्या झोतात आलेली अभिनेत्री गौहर खान अनेक चित्रपटांचा भाग बनली आहे. तिच्या ऑनस्क्रीन परफॉर्मन्सची दरवेळी तारीफच झाली. नुकतीच ती ‘द ऑफिस’ या वेबसिरीजमध्येही दिसली. ती म्हणते, मला अनेक ऑफर्स येत असतात, पण त्यातल्या बहुतांश भूमिकांमध्ये बोल्ड सीन्स करावे लागणार हे कळते. त्यामुळे मी त्या सर्व नाकारल्या. अशा भूमिकांना मी कनेक्टच होऊ शकत नाही. पडद्यावर मी बोल्ड सीन्स मुळीच करणार नाही. यावर मी ठामही आहे, असेही ती स्पष्ट करते. म्हणूनच गेल्या दीड दोन वर्षांत ती कुठलाच सिनेमा वा वेबसिरीजमध्ये दिसली नाही. ती विचारपूर्वक रोल निवडते.