टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्याला पितृशोक झाला आहे. आज सकाळी कार्डीएक अरेस्टने त्यांचे निधन झाले. वडिलांचे निधन झाले तेव्हा कृणाल पांड्या बडोदाकडून सैय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत खेळत होता. वडिलांच्या निधनाचे वृत्त कळताच तो घरी रवाना झाला.
दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने हार्दिक आणि कृणाल पांड्याच्या वडिलांच्या निधनावर दुःख व्यक्त केले. हार्दिक आणि कृणालच्या वडिलांच्या निधनाचे वृत्त ऐकून तीव्र दुःख झाले. मी दोन वेळा त्यांच्याशी संवाद साधला होता. ते खूप प्रसन्न आणि दिलखुलास स्वभावाचे होते. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
सौजन्य : दैनिक सामना