आज माणसाच्या दैनंदिन गरजेमध्ये सोशल मीडियाची भर पडलेली आहे. लहान, मोठे सर्वांनाच सोशल मीडियाचं वेड लागले आहे. प्रत्येक नाण्याच्या जशा दोन बाजू असतात तसंच सोशल मीडियाच्या बाबतीतही चांगली आणि वाईट अशा दोन बाजू पहायला मिळतात. या दोन्ही बाजू उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करत प्रलोभनाला बळी ठरलेल्या एका मध्यमवर्गीय शंतनूची गोष्ट ‘इमेल फिमेल’ या मराठी चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा २६ फेब्रुवारीला प्रदर्शित होतोय.
सोशल मीडियाच्या माध्यमातून दिशाभूल करणारे खूपजण असतात. पण त्यांच्यासोबत भरकटत जाणारे सुशिक्षित तरुणही त्याला तेवढेच जबाबदार असतात हे दाखवण्याचा प्रयत्न या सिनेमात केला आहे. योगेश जाधव यांचे दिग्दर्शन व लेखन असलेल्या या सिनेमात निखिल रत्नपारखी, विक्रम गोखले, विजय पाटकर, दिप्ती भागवत, कांचन पगारे, प्राजक्ता शिंदे, सुनील गोडबोले, कमलेश सावंत, प्रतीक्षा जाधव, श्वेता परदेशी व बालकलाकार मैथिली पटवर्धन यांच्या भूमिका आहेत. पटकथा भक्ती जाधव यांची असून संवाद भक्ती आणि योगेश जाधव यांनी लिहिले आहेत. छायांकन मयुरेश जोशी तर कलादिग्दर्शन नितीन बोरकर यांचे आहे.