• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

मेळघाटात मृतावस्थेत आढळला वाघ; शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार

टीम मार्मिक by टीम मार्मिक
January 22, 2021
in घडामोडी
0
मेळघाटात मृतावस्थेत आढळला वाघ; शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील रायपूर वनपरिक्षेत्रात एक वाघ मृतावस्थेत आढळून आला आहे. रायपूर वनपरीक्षेत्रातील वनकर्मचारी फायर लाईनचे काम असताना माडीझडप गावाजवळ 3 किलोमीटर अंतरावर एक वाघ मृतावस्थेत आढळला आहे. या वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

वनकर्मचाऱ्यांनी तात्काळ संबंधित वनअधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत मृत वाघाचा पंचनामा केला. वाघाच्या पंजाची 18 नखे, 4 दात, मिशा,कातडी शाबूत आहेत. तसेच मृत वाघाच्या शरीरवर कोणत्याही जखमा नाहीत. त्यामुळे वाघाची शिकार झाल्याचे प्राथमिक दृष्ट्या स्पष्ट होत नाही. हा वाघ 6 ते 7 वर्षाचा असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मृत वाघाचे मृत्यूचे कारण शोधण्यासाठी त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्यानंतर मृत वाघाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सौजन्य : दैनिक सामना 

Previous Post

जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेचा अभ्यासक्रम जाहीर, सरावासाठी मॉक टेस्टही उपलब्ध

Next Post

कोरोना लसींची तूर्तास खुल्या बाजारात विक्री नाही, केंद्रीय आरोग्य सचिवांची माहिती

Next Post
राज्यात लसीकरणासाठी 358 केंद्रे; मुंबईत 50, ठाण्यात 29, पुण्यात 39 केंद्रे

कोरोना लसींची तूर्तास खुल्या बाजारात विक्री नाही, केंद्रीय आरोग्य सचिवांची माहिती

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.