ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर याचे बॉलीवूड आणि टॉलीवूडवरचे प्रेम कुणापासूनही लपलेले नाही. मग त्याने कधी शीला की जवानी गाण्यावर केलेला डान्स असो किंवा अल्लू अर्जुनच्या बुट्टा बोम्मा या गाण्यावर पत्नीसोबत थिरकणे असो. हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीवरील प्रेम नेहमी तो व्यक्त करतो. आता वॉर्नरने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा सुपरस्टार रजनीकांत यांच्यावरील प्रेम दाखवून दिले आहे. वॉर्नरने रिफेस अॅपचा वापर करून सुपरस्टार रजनीकांत यांच्या जागी स्वतःचा चेहरा लावलेला एक व्हिडीओ त्याने नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच अपलोड केला. रजनीकांतच्या एका गाण्यावर त्याची वेगवेगळी रूपं दाखवण्यात आली आहेत. त्याच व्हिडीओत रजनीकांतच्या जागी वॉर्नरने स्वतःचा चेहरा रिप्लेस केला आहे. या व्हिडीओखाली दिलेल्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलंय, माझ्या अनेक चाहत्यांनी रजनीकांत यांच्यासंबंधीचा व्हिडीओ पोस्ट करण्याची मागणी केली होती. नववर्षाचे निमित्त साधून तुमच्यासाठी हा व्हिडीओ. दरम्यान, वॉर्नरचा हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला असून 1.80 मिलियन लोकांनी व्हिडीओ पाहिला आहे तर 27 हजार चाहत्यांनी त्यावर कमेंट केली आहे.
सौजन्य- सामना