पत्रकार दिनानिमित्त राज्यातील निवडक पत्रकारांना उत्कृष्ट पत्रकारितेबद्दल गौरवण्यात आले. यामध्ये दै. सामनाचे पत्रकार राजेश देशमाने यांचाही समावेश होता. राजेश देशमाने हे 1989 पासून ‘सामना’चे पत्रकार म्हणून काम करत आहेत. देशमाने हे सध्या बुलढाणा, जळगाव जिल्ह्याचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम पाहात आहेत. त्यांच्या 32 वर्षांच्या पत्रकारितेबद्दल त्यांना राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्या हस्ते राजभवनामध्ये झालेल्या सोहळ्यात उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देण्यात आला.