• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

सायबर फसवणुकीच्या जाळयात अडकू नका!

डॉ. संजय तुंगार by डॉ. संजय तुंगार
December 23, 2020
in भाष्य
0
सायबर फसवणुकीच्या जाळयात अडकू नका!

समाज माध्यमांवर कार्यरत असताना वागणुकीत आणि व्यक्तिमत्त्वात बदल झालेला दिसतो. समोरील व्यक्ती कोण आहे, त्यापासून काही धोका होऊ शकतो का? याचा विचार न करता अनेक जण बिनधास्तपणे गप्पा मारू लागतात. समाज माध्यमांवर वावरत असताना आपल्याला जर व्यक्तिमत्त्वात बदल झालेला दिसला तर ती धोक्याची घंटा समजावी.

अविनाशला एक दिवस मेल आला. त्यावर एका सुंदर मुलीचा फोटो होता आणि त्यानंतर तिची कैफियत सांगणारी कहाणी होती. त्यामध्ये माझ्याकडे खूप पैसे आहेत, मला त्यांची गुंतवणूक करण्यासाठी तुमची मदत हवी आहे, तुम्ही मला मदत केलीत तर तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो, मला फक्त थोडी मदत करा, असा मजकूर असणारे ते पत्र होते. आपण या पत्राच्या मोहात पडलो तर आपली खिशातली पुंजी जाऊ शकते, असा विचार करून सावध झालेल्या या व्यक्तीने क्षणात हा मेल डिलीट करून टाकला. कारण तो अशा प्रकाराबाबत खूप सजग होता. आताच्या परिस्थितीमध्ये ही सजगता प्रत्येकात असायला हवी. कोणत्याही मोहाला बळी न पडता, कोणत्याही मायाजालात न अडकता सजगता ठेवून सुरक्षित पाऊल टाकणे जरुरीचे आहे. तसे झाले तरच गुन्ह्यांना आळा बसू शकतो. कोरोनाच्या काळात माणसं घरात अडकल्यामुळे तसेच पैसे हाताळणे धोक्याचे झाल्यामुळे डिजिटल व्यवहार वाढले आहेत. साहजिकच सायबर लूटमारीच्या आणि फसवणुकीच्या घटनाही वाढल्या आहेत. सायबर चोरटे आपली कोणकोणत्या मार्गाने फसवणूक करू शकतात ते पाहू या.

इन्व्हॉईस चलन फसवणूक

बरेचदा छोटे उद्योजक आयात-निर्यातीचा उद्योग सुरू करतात. पैश्यांची देवाण-घेवाण करण्यासाठी काहीजण प्रâी ई-मेलचा वापर करतात. हे ई-मेल सुरक्षित नाहीत. या मेलशी साधर्म्य असणारे ई-मेल हॅकर तयार करतात. ‘आमचे ऑडिट सुरू आहे, त्यामुळे बँक अकाऊंट बदलले आहे. तुम्ही नवीन अकाऊंटमध्ये पैसे टाका’ असे सांगतात. काहीजण त्याला फसतात. आयात-निर्यातीचा उद्योग करत असताना व्यावसायिकांनी कॉर्पोरेट ई-मेलचा वापर करायला हवा, याची माहिती अनेकांना नसते, त्यातून हे प्रकार होतात. त्यामुळे हा व्यवसाय सुरू करताना बारकावे पाहून काम सुरू करायला हवे. काही दिवसांपूर्वी पिंपरीमध्ये एका व्यक्तीने आयात-निर्यात व्यवसाय सुरू केला. जमीन विकून आलेले पैसे त्याने यात टाकले आणि व्यापार कसा करायचा याची माहिती नसल्याने त्याची पैसे ट्रान्सफर करताना एक कोटी रुपयांची फसगत झाली.

डिजिटल सहीचा वापर महत्त्वाचा

तुम्ही संकेतस्थळाचा वापर करून ऑनलाइन खरेदी करता तेव्हा फसवणूक होण्याची शक्यता असते. म्हणून हे व्यवहार करताना डिजिटल सहीचा वापर करावा. यामुळे पैशांची देवाण-घेवाण करणे सुरक्षित होते. मोबाईल सर्व्हिस देणार्‍या कंपन्या ही सेवा देतात. भारत संचार निगमसारख्या कंपन्याही या सेवा देतात. वर्षाला त्यासाठी काही रक्कम घेतली जाते.
अलीकडच्या काळात विवाह जुळवणार्‍या संकेतस्थळावरून फसवणूक करण्याचे प्रकारदेखील वाढू लागले आहेत. यासाठी महिलांनी सुरक्षित राहणे गरजेचे आहे. मी लष्करात आहे, पोलीसखात्यात आहे असे सांगून मुलींना फसवण्याचे प्रकार वाढताना दिसत आहेत. ही मंडळी काही क्लृप्त्या वापरून फसवत असतात. अनोळखी व्यक्तींबरोबर मैत्री करत असताना कोणत्याही मोहाला बळी पडू नका. पूर्णपणे सावधगिरी बाळगा.

 

नायजेरिन लेटर

तुम्ही अगोदर पैसे द्या, आमच्या व्यवसायातून तुम्हाला चांगला फायदा मिळेल असे आमिष दाखवून ही सायबर फसवणूक केली जाते. भारतातील व्यवहार करण्यासाठी तुमचे बँक अकाऊंट हवे आहे, असे सांगून फसवणूक होते. हे प्रकार सुरू होण्याआधी तुम्ही काही पैसे देण्याची मागणी केली जाते. अशा प्रकारच्या फसवणुकीला अचानकपणे सुरुवात होते. यामध्ये गुप्तता पाळण्याबाबत सांगितले जाते. पैशांच्या लोभापायी यामध्ये अनेकजण फसतात.

समाजमाध्यमांवर खोटी अकाऊंट

अनेकदा फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅप आदी माध्यमांवर खोटी अकाऊंट काढून फसवणूक करण्याचे प्रकार होतात. या ठिकाणी अकाऊंट काढण्यासाठी कोणतेही नियम नाहीत, त्यामुळे हे प्रकार होत असतात. आतापर्यंत सेलिब्रेटी आणि काही लोकांबाबत असे प्रकार झाले आहेत.

फिशिंग आणि विशिंग

फिशिंग प्रकारमध्ये आवाजाचा वापर करून सावज शोधून त्याला फसवले जाते. आपण बँक, विमा कंपनी, इन्कम टॅक्स अशा ठिकाणाहून बोलतोय असं सांगून आर्थिक फसवणूक केली जाते.

इथून होतात हे प्रकार

झारखंडमधील जमतारा, दिल्लीमधील वसंत विहार, मुंबईजवळील वसई, मीरा-भाईंदर या भागांतून फिशिंगच्या माध्यमातून फसवणूक करण्याचे प्रकार केले जातात. आप्रिâकन देशांमधून आलेले विद्यार्थी या प्रकरणामध्ये दिसतात.

कार्ड फसवणूक

डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून फसवणूक करण्याचे दोन प्रकार आहेत. त्यामध्ये कार्ड क्लोन करणे, कार्ड बदलणे, स्किमरचा वापर करणे असे प्रकार केले जातात. दुसर्‍या प्रकारात कार्डवरील माहितीची चोरी करून बनावट कार्ड तयार करून फसवले जाते. कोडचा वापर हा पैसे देण्यासाठी करतात, मात्र अलीकडल्या काळात पैसे जमा करण्यासाठी तुम्हाला पाठवलेला कोड स्कॅन करा असे सांगून त्यामधून फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहेत.

महाराष्ट्र, कर्नाटक आणि दिल्ली आघाडीवर

सायबर गुन्हे या तीन राज्यांत जास्त असून हे प्रमाण सुमारे ४० टक्के इतके आहे. ऑनलाइन व्यवहारांचे प्रमाण वाढत असले तरी नागरिकांमध्ये त्याबाबत अधिक सजगता येणे गरजेचे आहे. लॉकडाऊन काळात ऑनलाइन व्यवहारांचे प्रमाण वाढलेले आहे.

ऑफलाइन आहात तसे ऑनलाइनमध्ये राहा

समाज माध्यमांवर कार्यरत असताना अचानक वागणुकीत आणि व्यक्तिमत्त्वात बदल झालेला दिसतो. समोरील व्यक्ती कोण आहे, त्यापासून काही धोका होऊ शकतो का? याचा विचार न करता अनेक जण बिनधास्त गप्पा मारू लागतात. समाज माध्यमांवर वावरत असताना आपल्याला जर व्यक्तिमत्त्वात बदल झालेला दिसला तर ती धोक्याची घंटा समजावी. खास करून तरुण हे चांगले नेटीझन्स व्हावेत यासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये खास करून व्यवस्था नाही, त्यासाठी प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे. नॉर्मल जीवन जगताना आपण जसे असतो तसेच ऑनलाइन असताना राहिलो तर ते आधी फायदेशीर ठरणारे आहे.

शब्दांकन : सुधीर साबळे

समाजमाध्यमे वापरताना…

इंटरनेटद्वारे समाजमाध्यमांचा वापर करताना त्यावर चुकीची माहिती टाकू नका. पासवर्ड तयार करताना त्यामध्ये आकडे, चिन्हे आदींचा वापर करावा. आपला पासवर्ड काही दिवसांनी अवश्य बदलावा. सार्वजनिक ठिकाणी असणारी वायफाय सुविधा शक्यतो वापरूच नव्हे, पण वापरावी लागलीच तर योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. अनोळखी व्यक्तींना मोबाईल नंबर देऊ नका. आपल्या परवानगीखेरीज इंटरनेटवरील आपले फोटो इतर कोणाला घेण्यास परवानगी देऊ नका. कारण यामधून तुमची फसवणूक होऊ शकते हे लक्षात ठेवा. ब्लूटुथचा वापर करतानाही सावधगिरी बाळगा. मोबाइल फोन हरवला तर तत्काळ पोलीस चौकीत तक्रार करा आणि मोबाईल सेवा देणार्‍या कंपनीलाही कळवा. बरेचदा ई-मेलमध्ये दुसरी एखादी लिंक असते, ती चुकूनही ओपन करू नका, त्यामधून धोका होऊ शकतो. अनेकजण फसवणूक करण्यासाठी फसवे फोन करून जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करतात, त्याबाबत कायम सजग राहा.


(लेखक पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात सायबर सेल विभागाचे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.)

Previous Post

तेजस्विनी लोणारीचा फिटनेस मंत्र

Next Post

मुंबई, ठाण्यासह राज्यभर हुडहुडी; सांताक्रूझमध्ये हंगामातील निचांकी 18 अंशाची नोंद

Related Posts

भाष्य

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025
भाष्य

सोमीताईचा सल्ला

May 15, 2025
भाष्य

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025
भाष्य

‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

May 8, 2025
Next Post
मुंबई, ठाण्यासह राज्यभर हुडहुडी; सांताक्रूझमध्ये हंगामातील निचांकी 18 अंशाची नोंद

मुंबई, ठाण्यासह राज्यभर हुडहुडी; सांताक्रूझमध्ये हंगामातील निचांकी 18 अंशाची नोंद

अर्णब गोस्वामी आणि कंगनाच्या सगळय़ा विचारांशी आम्ही सहमत नाही, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

माझी इच्छा आहे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवावी! देवेंद्र फडणवीस

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.