कोरोनावरील लस लवकरच उपलब्ध होणार असून ती कोरोना संसर्ग झालेल्यांबरोबरच कर्करोग रुग्णांसाठीही फायदेशीर ठरणार असल्याचे मत वाशी येथील ऑन्पुरा पॅन्सर केअर अॅण्ड एमजीएम रुग्णालयील मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. पुष्पक चिरमाडे यांनी व्यक्त केले आहे. कोरोनावरील लसीमुळे रुग्णाची प्रतिकारशक्ती वाढते. तर कर्करोगग्रस्तांसाठीही प्रतिकारशक्ती वाढणे गरजेचे असते. त्यामुळे या लसीचा संबंधितांना फायदा होऊ शकणार आहे, मात्र असे असले तरी रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच कोरोना लस घ्यावी असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
लसी शरीरात कोणते प्रोटीन तयार करायचे आहे याच्या सूचना शरीराला देत असतात. आजाराविरोधात रोगप्रतिकारकशक्ती तयार होऊ शकणार असून त्याचे परिणामही चांगले असल्याचे चिरमाडे यांनी सांगितले आहे. कोरोनापासून बचाव व्हावा याकरिता लसीच्या चाचण्यांमध्ये अद्यापही कर्करोगासारख्या गंभीर विकाराच्या रुग्णांचा यात समावेश करण्यात आलेला नाही. लस अधिक प्रमाणात उपलब्ध झाल्यावर त्याचे फायदे आणि दुष्परिणाम याबद्दल माहिती मिळू शकेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
सौजन्य : दैनिक सामना