मध्य प्रदेशच्या पोट निवडणुकांच्या 53 दिवसांनंतर रविवारी अखेर कॅबिनेटचा तिसरा विस्तार झाला. मात्र असे असले तरी शिवराज सरकारची डोकेदुखी अद्याप संपलेली नाही. राज्यसभेचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांचे समर्थक तुलसीराम सिलावट आणि गोविंद सिंह राजपूत यांचा मंत्रिमंडळात प्रवेश झाल्यानंतर देखील कॅबिनेटमध्ये चार मंत्री पद अजून रिकामे आहेत. तर भाजपचे वरिष्ठ आमदार अजूनही मंत्री बनणण्यासाठी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर दबाव टाकून होते, मात्र मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले नाही. ‘आजतक’ने यासंदर्भातील वृत्तप्रसिद्ध केलेले आहे.
गेल्यावर्षी मार्च मध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आपले 22 समर्थक आंदोलकांसोबत काँग्रेस पक्षाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे कमलनाथ सरकार अल्पमतात आले आणि 15 महिन्यात भाजप सरकारमध्ये परतण्याचा रस्ता खुला झाला. मग शिवराज सिंह चौहान चौथ्यांदा मुख्यमंत्री बनले आणि सरकार सिंधिया यांच्यासोबत आलेल्या आमदारांचा दबदबा पाहायला मिळाला. अशाप्रकारे शिवराज सिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळात सिंधिया समर्थक एकूण 14 आमदारांना मंत्री आणि राज्यमंत्री बनवले होते.
चौथ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना शिवराज सिंह यांच्यासह,5 मंत्र्यांनी शपथ घेतली होती. यामध्ये गोविंद सिंह राजपूत आणि तुलसी सिलावट सहभागी होते मात्र 6 महिन्यात निवडणूक न घेतल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला.
सौजन्य : दैनिक सामना