माय स्टॅम्प योजनेच्या माध्यमातून टपाल विभागाचा अनागोंदी कारभार पुढे आला आहे. टपाल विभागाने चक्क अंडरवर्ल्ड डॉन माफियांचे फोटो पोस्टाच्या तिकिटावर छापले आहेत. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन आणि बागपत जेलमध्ये मारला गेलेला गँगस्टर मुन्ना बजरंगी यांचे फोटो असलेली तिकिटे प्रसिद्ध केली आहेत. या प्रकरणी सध्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. टपाल तिकीट म्हटलं की त्यावर अनेक महान व्यक्ती, स्मारकं तसेच मोलाची कामगिरी करणाऱया व्यक्तींचे फोटो छापलेले दिसतात. पण कानपूरच्या टपाल विभागाने ‘माय स्टॅम्प’ योजनेअंतर्गत अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन आणि बागपत गँगस्टर मुन्ना बजरंगी यांचे फोटो असलेली प्रत्येकी पाच रुपयांची 12 तिकिटे प्रसिद्ध केली आहेत. या प्रकाराची गंभीर दखल घेत पोस्ट मास्टर जनरल वीके वर्मा यांनी चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
सौजन्य: दैनिक सामना