चीनने जलविद्युत योजनेच्या नावाखाली ब्रह्मपुत्रा नदीवर एक प्रचंड मोठा बांध बांधण्याचा निर्णय घेतला आहे. चीनच्या आधिकृत मीडियाने बांध उभारण्याचा कंत्राट मिळालेल्या एका चीनी कंपनीच्या प्रमुखाच्या हवाल्याने माहिती प्रसिद्ध केली आहे की चीन, तिबेट मध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर एक मोठा बांध बांधणार आहे. पुढील वर्षी लागू होणाऱ्या 14व्या पंचवार्षिक योजनेत यासंदर्भातील प्रस्ताव पारित करण्यात आला आहे.
‘ग्लोबल टाइम्स’ने रविवारी ‘कम्युनिस्ट यूथ लीग ऑफ चायना’च्या केन्द्रीय समितिच्या वी-चॅट अकाउंटवर टाकण्यात आलेल्याला एका लेखाचा हवाला देत माहिती जाहीर केली आहे, ज्यामध्ये यांग यांनी सांगितले आहे की सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना (सीपीसी) देशाची 14वीं पंचवार्षिक योजना (2021-25) तयार करत आहे. यामध्ये विविध प्रस्ताव आहेत. त्यामध्ये या प्रस्तावाचा समावेश देखील करण्यात आला आहे. 2035 पर्यंत हा बांध पूर्ण होईल असे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. योजनाच्या संदर्भात सविस्तर माहिती पुढल्यावर्षी नेशनल पीपुल्स कांग्रेस (एनपीसी) द्वारे औपचारिक समर्थनानंतर सर्वांसमोर येण्याची शक्यता आहे.
ब्रह्मपुत्रा नदीवर बांध घालून चीन हिंदुस्थान आणि बांगलादेश या दोन्ही देशांना अडचणीत आणू शकतो. कारण ब्रह्मपुत्रा नदी चीनमधून हिंदुस्थान आणि पुढे बांगलादेशात प्रवेश करते. त्यामुळे चीनच्या निर्णयाचा दोन्ही देशांवर परिणाम होऊ शकतो. अर्थात हिंदुस्थानने वेळोवेळी चीनला याची सूचना दिली आहे की त्यांच्या निर्णयाचा इतर देशांना त्रास होऊ नये ही चीनची जबाबदारी आहे. आता या नव्या प्रस्तावावर चिनी सरकार काय निर्णय घेणार हे पुढल्यावर्षी स्पष्ट होईल.
सौजन्य : दैनिक सामना