कुठल्याही मालिकेत नव्या व्यक्तिरेखेचा प्रवेश होतो तेव्हा कथानकात नवी वळणे येतात हे सरळ आहे. सोनी मनोरंजन वाहिनीवर सध्या सुरू असलेल्या ‘क्यों उत्थे दिल छोड़ आए’ या मालिकेतही अभिनेत्री चारू असोपा हिच्या एण्ट्रीमुळे असेच काहीसे होणार आहे. तिच्या येण्यामुळे अमृत आणि रणधीर यांच्या जीवनात उलथापालथ होणार आहे. चारू असोपा ही छोटेया पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. याआधीही ती अनेक गाजलेल्या मालिकांचा हिस्सा राहिली आहे. मुळात ती उत्कृष्ट क्लासिकल कथ्थक डान्सर असल्यामुळे तिच्या टॅलेंटमध्ये भरच पडली आहे.
आता या मालिकेत ती जोरबा बाईचा रोल करणार आहे, जिला बेग हाऊसमध्ये होणाऱ्या सोहळ्यात नृत्य करायला बोलावण्यात आले आहे. याच सोहळ्यात ती रणधीरवर एक गंभीर आरोप करेल. यामुळे अमृतही चकीत होणार आहे. आता रणधीर स्वत:ला निर्दोष कसा सिद्ध करेल ते पाहायचे. आपल्या एण्ट्रीबाबत चारू म्हणते, मी कथ्थक नृत्यांगना असूनही आजवर डान्सरची भूमिका केली नव्हती, म्हणून माझ्यासाठी ही भूमिका खूपच महत्त्वाची आहे. प्रेक्षक आता माझे डान्सिंग स्कील बघतील, असेही ती सांगते.