• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

तेजस ठाकरे यांचे नवे संशोधन, मेघालयात शोधला चन्ना स्नेकहेड

टीम मार्मिक by टीम मार्मिक
December 25, 2020
in घडामोडी
0
तेजस ठाकरे यांचे नवे संशोधन, मेघालयात शोधला चन्ना स्नेकहेड

निसर्गातील जैवविविधतेवर संशोधन करणाऱ्य़ा तेजस ठाकरे यांनी पश्चिम घाट, सह्याद्रीच्या पर्वतरांगांत केलेल्या संशोधनानंतर आता मेघालयातही महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. मेघालयातील खासी टेकडय़ांतून तेजस ठाकरे यांच्या टीमने अत्यंत सुंदर आणि तितकाच दुर्मिळ असा ‘चन्ना स्नेकहेड’ हा मासा शोधला आहे. त्यांच्या या संशोधनाची दखल अमेरिकेतील ‘कोपिया- अमेरिकन सोसायटी ऑफ इचिथोलॉजिस्ट अँड हर्पेटोलॉजिस्ट ऑफिशियल जर्नल’ने घेतली आहे. या जर्नलमध्ये त्यांचे हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

पश्चिम घाट असो की सह्याद्रीतील दऱ्य़ाखोऱ्य़ा आणि आता थेट मेघालयातील टेकडय़ा तेजस ठाकरे निसर्गाच्या जैवविविधतेतून नवनवीन प्रजातींचा शोध घेत आहेत. मेघालयातील या संशोधनात त्यांच्यासह जे. कृथ्वीराज, एस. गजेंद्रो, ए. उमा, एन मौलीथरन आणि एम. बँकीट हे संशोधकही सहभागी झाले. मेघालयातील डोंगर कपाऱ्य़ा, टेकडय़ा पिंजून काढताना त्यांना या अत्यंत सुंदर अशा दुर्मिळ माशाचा शोध लागला. या माशाचे वर्णन करणारा शोधनिबंध तयार करून त्यांनी तो अमेरिकेतील ‘कोपिया – अमेरिकन सोसायटी ऑफ इचिथोलॉजिस्ट अँड हर्पेटोलॉजिस्ट ऑफिशियल जर्नल’ला पाठवला. हे संशोधन या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले.

निळय़ाशार सौंदर्याचा आनंद घ्या

तेजस ठाकरे यांनी याची माहिती आपल्या इन्स्टाग्राम पेजवर दिली असून अमेरिकेतील जर्नलमध्ये ती प्रकाशित झाली आहे. चन्ना स्नेकहेड या प्रजातीला ऑरिस्टॉन एम. रेंडॉन्गसंगी यांचे नाव देणार असल्याचे तेजस ठाकरे यांनी म्हटले आहे. ऑरिस्टॉन यांनी पहिल्यांदा ही प्रजाती शोधली आणि या प्रजातीचे संशोधन करण्यात तेजस ठाकरे यांच्या टीमलाही त्यांनी मोठे सहकार्य केले, अशी माहिती देतानाच निळय़ाशार माशाच्या सौंदर्याचा आनंद घ्या, असे तेजस ठाकरे यांनी इन्स्टाग्रामवर म्हटले आहे.

  • तेजस ठाकरे यांनी आतापर्यंत 11 दुर्मिळ वन्य प्रजातींचा शोध लावला आहे. ज्यात खेकडा, पाली आणि इतर वन्यजीवनांचा समावेश आहे.
  • खेकडय़ांविषयीचे संशोधन न्यूझीलंडमधील झुटाक्सा अंकात प्रसिद्ध झाले आहे.
  • पश्चिम घाटात त्यांनी एक खेकडय़ाचा शोध लावला होता. त्याला सह्याद्रिना असे नाव देण्यात आले होते.
  • काही दिवसांपूर्वीच त्यांनी हिरण्यकेशी या दुर्मिळ माशांच्या प्रजातीचा शोध लावला होता.

 

सौजन्य- सामना

Previous Post

माझा दहावीचा अभ्यास जोरात सुरू आहे…

Next Post

वडिलांसाठी बनवला रिमोटवर चालणारा ट्रॅक्टर

Next Post
वडिलांसाठी बनवला रिमोटवर चालणारा ट्रॅक्टर

वडिलांसाठी बनवला रिमोटवर चालणारा ट्रॅक्टर

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.