स्त्रीत्व इतकं महान आहे की ते साजरं करण्यासाठी फक्त एक दिवस असणं हे खूप केविलवाणं आहे. स्त्रीचा आणि स्त्रीत्वाचा आदर करणं जेव्हा सगळ्यांना जमेल तोच दिवस खरा सोन्याचा दिवस असेल आणि खऱया अर्थाने महिला दिवस असेल.
मी स्वतः एक खेळाडू आहे. मी ज्युडो-कराटेच प्रशिक्षण घेतलेलं आहे. त्यामुळे महिला दिनानिमित्त मी आजूबाजूच्या शाळांमधल्या मुलींना एकत्र करून त्यांच्यात आत्मविश्वास वाढवण्याचे आणि जमेल तसे त्यांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न करते. माझी सगळ्यात मोठी ताकद माझी आई आहे.
माझा नीडरपणा आणि माझा आत्मविश्वास आहे. तेजस्विनी नावाची माझी एक संस्था आहे. संस्थेशी अनेक महिला जोडलेल्या आहेत. तसेच एक महिला बचत गट पण आहे. त्यांच्यासाठी आम्ही महिला दिनानिमित्त काही उपक्रमांचे आयोजन करतो. स्त्रियांनी प्रत्येक दिवस साजरा करावा.
सौजन्य : दैनिक सामना