उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे विषारी दारू प्यायल्याने 5 जणांचा मृत्यू झाला असून 15 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी ग्रामस्थांनी अबकारी विभाग आणि दारू विक्रेत्यांच्या संगनमतामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप केला आहे.
उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे विषारी दारू प्यायल्याने 5 जणांचा मृत्यू झाला असून 15 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी ग्रामस्थांनी अबकारी विभाग आणि दारू विक्रेत्यांच्या संगनमतामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप केला आहे.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, बुलंदशहर येथील सिकंदराबाद तालुक्यातील जीतगढी येथे ही दुर्घटना घडली. येथील तब्बल 20 जणांना अचानक विषबाधा झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेव्हा, या सगळ्यांनी दारू प्यायल्याचं निष्पन्न झालं दारू प्यायल्यानंतरच त्यांची प्रकृती बिघडली होती. उपचारांदरम्यान पाच जण मृत्युमुखी पडले. तर 15 जणांवर उपचार सुरू आहेत.
थाना सिकन्द्राबाद क्षेत्र ग्राम जीतगढ़ी मे शराब पीने से हुई 04 व्यक्तियों की मृत्यु की घटना एवं लापरवाही पर SHO सिकंद्राबाद,चौकी प्रभारी व दो बीट आरक्षियों को निलंबित किए जाने के संबंध में SSP की बाइट @dgpup @CMOfficeUP @UPGovt @HomeDepttUP @Uppolice @adgzonemeerut @igrangemeerut pic.twitter.com/BILGPm1UzR
— Bulandshahr Police (@bulandshahrpol) January 8, 2021
या 15 जणांची प्रकृतीही गंभीर असून त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान ग्रामस्थांनी या प्रकरणी प्रशासकीय विभागांवर आरोप केले आहेत. गावातील काही गुत्त्यांवर विषारी दारू विकली जाते, हे अबकारी विभागाला माहीत असूनही त्यांनी काहीही कारवाई केली नाही, असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे.
मृत्युमुखी पडलेल्यांचे शवविच्छेदन झाल्यानंतर चित्र स्पष्ट होऊ शकेल. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दोषींच्या विरोधात कठोर कारवाई देण्याचे आदेश दिले आहेत. तसंच, या प्रकरणी जीतगढी पोलीस स्थानकातील संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी निलंबित करण्यात आलं आहे.
सौजन्य : सामना