बीएसएफचा जवान हनिट्रपमध्ये अडकल्याचे उघड झाले असून, त्याने पाकिस्तानी महिलेला आपल्या व्हॉट्सऍप ग्रुपमध्ये ऍड करून काही माहिती लिक केल्याची घटना उजेडात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हा जवान नगर तालुक्यातील ससेवाडी येथील आहे. पंजाब पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली आहे. प्रकाश काळे असे या जवानाचे नाव आहे.
प्रकाश काळे हा सीमा सुरक्षा दलामध्ये जवान म्हणून कार्यरत आहे. नगर तालुक्यातील ससेवाडी येथील तो मूळचा रहिवासी आहे. 2019 पासून तो पंजाबमध्ये नियुक्तीवर आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचा एका पाकिस्तानी महिला एजंटसोबत त्याचा संपर्क झाला. त्या महिलेने त्या जवानाला जाळ्यात अडकवले. काळे याने आपल्या सहकाऱयांचा एक व्हॉट्सऍप ग्रुप तयार केला. त्यामुध्ये त्या पाकिस्तानी महिलेला त्याने समाविष्ट केले. या ग्रुपद्वारे सर्व माहिती त्या महिलेला कळत होती. कोणाच्या नियुक्त्या कशा केल्या, कोठे झाल्या, कोण कोठे कार्यरत आहेत, याची माहिती तिला त्यातून मिळत होती.