कोरोना अजून गेलेला नाही तर बेजबाबदार नागरिकांडून नियमांचे उल्लंघन होत आहे. अनेक लोक घराबाहेर पडताना मास्क लावत नाही. अशा बेजबादार नागरिकांना मुंबई महानगर पालिकेने 200 रुपयांचा दंड आकारला आहे. मंगळवारी पालिकेने 14 हजार 600 जणांना दंड आकारला असून त्यांच्याकडून 29 लाख रुपयांचा दंड आकारला आहे. पालिकेने मार्च 2020 पासून आतापर्यंत कोट्यवधींचा दंड आकारला आहे.
मार्च 2020 पासून पालिकेने 15 लाख नागरिकांना मास्क न घातल्याबद्दल दंड आकारला आहे. हा दंड एकूण 30 कोटी 50 लाख इतका आहे.
पालिकेने दिलेल्या माहितीनुसार कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 23 फेब्रुवारी रोजी22 हजार 976 जणांवर कारवाई करण्यात आली. त्यातून 45 लाख 95 हजार एवढा दंड आकारण्यात आला. शनिवारी रविवारी रोजी पालिकेने 60 लाख रुपयांचा दंड आकारला आहे.
मध्य आणि पश्चिम रेल्वेला दंडाच्या स्वरुपात आतापर्यंत 91 हजार 800 रुपये मिळाले आहेत. तर मुंबई महानगरपालिका दिवसाला सरासरी 13 हजार बेशिस्त नागरिकांवर कारवाई करत असून 25 लाख रुपयांचा दंड आकारला आहे. ज्या नागरिकांकडे दंड भरण्यासाठी पैसे नाही त्यांना रस्ते साफ करण्याची शिक्षा देण्यात आहे.
सौजन्य : दैनिक सामना