• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

दोन्ही डोळ्यांनी नेत्रहीन लताने केले कळसूबाई शिखर सर

टीम मार्मिक by टीम मार्मिक
January 7, 2021
in घडामोडी
0
दोन्ही डोळ्यांनी नेत्रहीन लताने केले कळसूबाई शिखर सर

पूर्णा तालुक्यातील देऊळगाव दुधाटे येथील उध्दवराव व अरुणाबाई यांची मुलगी लता ही युवती नेत्रहीन आहे. तरीही महाराष्ट्रातील सर्वात उंच व चढाईला अतिशय कठीण मानले जाणारे कळसूबाई हे तब्बल 5 हजार 400 मीटरचे शिखर सर करीत लताने वेगळा आदर्श प्रस्थापित केला आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला तिने ही मोहिम फत्ते केली.

शिवार्जुन प्रतिष्ठानकडून दरवर्षी दिव्यांग युवक-युवतींना कळसूबाई शिखर करण्याची मोहिम आखून प्रोत्साहित केले जाते. यावर्षी प्रतिष्ठानच्या वतीने राज्यातील 20 जिल्ह्यांतील 70 दिव्यांग युवांना 30 डिसेंबरच्या मध्यरात्री सह्याद्री पायथ्याशी असलेल्या जाहिंगीरदारवाडी गावात एकत्र आणण्यात आले.

दुसऱ्या दिवशी सकाळी मोहिमेला सुरुवात झाली. या मोहिमेत लता पांचाळ आपल्या काही मैंत्रिणींच्या मार्गदर्शनाखाली सहभागी झाली होती. कोणताही नकारात्मक विचार तिच्या मनाला शिवला नाही. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, कळसूबाई माता की जय, हर हर महादेव अशा घोषणा देत इतर दिव्यांगासोबत लताने शिखर चढाईसाठी कूच केली. या मोहिमेत सहभागी दिव्यांग एकमेकांना आधार देत एकमेकांचे मनोबल वाढवत होते.

कळसूबाई शिखर सर करताना शेवटी येणाऱ्या चार लोखंडी शिड्या लताने मोठ्या जिद्दीने पार केल्या व नववर्षाच्या पूर्वसंध्येला तिने हे शिखर सर केले. शिखराचा माथा गाठल्यावर सर्वांनी कडाक्याच्या थंडीत तंबूमध्ये मुक्काम केला. नववर्षाच्या पहाटे सह्याद्री पर्वताच्या माथ्यावर असलेल्या कळसूबाई मंदिरात त्यांनी दर्शन घेतले. तसेच उगवत्या सूर्याला नमस्कार करुन सकाळी 10 वाजता परतीची वाट धरत खाली उतरण्यास सुरुवात केली. शिखरावरुन खाली उतरताना काळजीपुर्वक पावले टाकावी लागत होती. कारण संपूर्ण वाट निसरडी होती, असे लताने सांगितले. मोहिमेत सहभागी सर्व दिव्यांगांना शिवुर्जा प्रतिष्ठानच्या वतीने प्रमाणपत्र व पदक देवून सन्मानित करण्यात आले.

जन्मत: दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या लताला मामा प्रभाकर यांच्या आग्रहामुळे नांदेड येथील श्री गुरुगोविंदसिंग माध्यमिक अंध विद्यालयात पहिली ते आठवीपर्यंत दिव्यांगासाठीचे विशेष शिक्षण घेता आले. त्यानंतर तिने बारापीपर्यंतचे शिक्षण नांदेडला राहूनच पुर्ण केले. नंतर पुढच्या शिक्षणाासाठी तिने पुणे गाठले. एस.पी. कॉलेजमधून बी.ए. केले असून सध्या ती पुण्यातील आकुर्डी भागात रामकृष्ण मोरे महाविद्यालयात अर्थशास्त्र विषयात एम.ए. करीत आहे. विशेष म्हणजे ती एकटीनेच प्रवास करते. परभणी ते पुणे हा प्रवास तर नेहमीचाच पण एकदा ती देहरादूनच्या केंद्रीय अंध विद्यालयात प्रशिक्षणासाठी गेली ती देखील एकटीनेच प्रवास करत. तिने कॉम्प्युटरचे अनेक कोर्सेस केलेले आहेत. गावाकडे वडील सुतारकीचा पारंपरिक व्यवसाय करतात. आई गृहिणी असून लताला दोन विवाहित बहिणी व एक भाऊ आहे. सार्वत लहान असलेली लता कुटुंबियांची लाडकी आहे.

महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील कळसूबाई शिखराचे गिर्यारोहकांच्या दृष्टीने आगळेवेगळे महत्त्व आहे. गिर्यारोहणाच्या अनेक मोठ्या मोहिमांपूर्वी गिर्यारोहक कळसूबाई सर करण्याचा सराव करतात. अत्यंत आव्हानात्मक मानल्या जाणारे हे शिखर चढण्यापूर्वी अनेक दिवस सराव करावा लागतो. 5 ते 6 तासांच्या मोहिमेत लताने कळसूबाई शिखर सर करण्याबरोबरच परतीचा प्रवास पूर्ण करत आपल्या शारिरिक व मानसिक क्षमतेचा परिचय करून दिला आहे.

लता पांचाळ हिने 2018 साली पुण्यात इतर मैंत्रिणींकडून ट्रेकींगबद्दल खुपदा ऐकल्याने उत्सुकता वाढली. इतर मुली करू शकतात मग आपण का करु शकत नाही. या जिद्दीने तिने 2 वर्षांपूर्वी प्रतापगड सर केला. महत्त्वाचे म्हणजे ज्या लताला दोन पावले चालायला त्रास व्हायचा तीच युवती आज ट्रेकिंग करत आहे. तिला लहानपणापासून नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड आहे. नवीन वर्षानिमित्त अंध मुला-मुलींसाठी आयोजित केलेल्या कळसूबाई शिखर मोहिमेत सहभागी होण्याचा लताने निर्धार केला आणि हे शिखर सर केल्याने आत्मविश्वास दुणावला आहे.

सौजन्य : दैनिक सामना 

Previous Post

नायजेरियात दहशतवादी हल्ला, 100 नागरिक ठार

Next Post

‘सेक्रेड गेम्स’चा तिसरा सिझन नाहीच

Next Post
‘सेक्रेड गेम्स’चा तिसरा सिझन नाहीच

‘सेक्रेड गेम्स’चा तिसरा सिझन नाहीच

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.