• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

शिवतेजाला आदरांजली, लाडक्या साहेबांच्या स्मृतिस्थळी हजारो नतमस्तक

टीम मार्मिक by टीम मार्मिक
January 24, 2021
in घडामोडी
0
शिवतेजाला आदरांजली, लाडक्या साहेबांच्या स्मृतिस्थळी हजारो नतमस्तक

ज्वलंत हिंदुत्वाचे धगधगते अग्निकुंड, लाखो-करोडो शिवसैनिकांचे दैवत आणि मराठी माणसाच्या मनात स्वाभिमानाचा अंगार चेतवणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आज 95 व्या जयंतीनिमित्त राज्य आणि देशाच्या कानाकोपऱयातून आदरांजली वाहण्यात आली. शिवतीर्थावरील आपल्या लाडक्या साहेबांच्या स्मृतिस्थळावर लहान थोर, नेते, पुढारी, सर्वसामान्य असे सर्वच नतमस्तक झाले. सर्व जातीधर्माच्या नागरिकांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’ अशा जयघोषात या प्रखर हिंदुतेजाला पुष्पांजली अर्पण केली.

शिवसेनाप्रमुख म्हणजे मराठी मनाचा मानबिंदू. समस्त हिंदूंचे आदरस्थान. शिवसेनाप्रमुख हे केवळ शिवसैनिकांचेच नव्हे तर सर्वांचेच लाडके नेते होते. प्रत्येक पीढीचे स्फूर्तिस्थान होते. आजही त्यांचे विचार मराठी माणसाला आणि हिंदूंना प्रेरणा देतात. तीच स्फूर्ती आणि प्रेरणा घेण्यासाठी लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत अनेकांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी वंदन केले. साहेबांचा फोटो गळ्यात घालून कांदिवलीहून आलेल्या चार वर्षीय पलक सावंत हिच्यासह अनेक चिमुकली स्मृतिस्थळावर नतमस्तक झाली.

शिवतीर्थ भगवेमय

शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीदिनी आज शिवतीर्थाचा परिसर भगवामय झाला होता. अनेक जण हाती भगवा झेंडा घेऊन स्मृतिस्थळी आले होते. जन्मदिनानिमित्त साहेबांच्या स्मृतिस्थळावर रंगीबेरंगी फुलांची आरास करण्यात आली होती. स्मृतिस्थळाभोवती झेंडूच्या भगव्या फुलांची आकर्षक सजावट लक्षवेधी ठरत होती. शिवसेनाप्रमुखांच्या तसबिरीला त्यांच्या आवडत्या मनमोहक चाफ्याच्या फुलांनी सजवण्यात आले होते. हिंदू, मुस्लिम, शीख अशा सर्वच धर्मीयांनी शिवसेनाप्रमुखांना मनोभावे आदरांजली अर्पण केली.

मान्यवरांकडून अभिवादन

शिवसेनाप्रमुखांना वंदन करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्री, आमदार, खासदार सकाळपासूनच शिवतीर्थावर येत होते. शिवसेना नेते रामदास कदम, शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई, उपनेते खासदार अरविंद सावंत, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे, विशाखा राऊत, खासदार राहुल शेवाळे, राज्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत, म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर, आमदार सदा सरवणकर, अजय चौधरी, प्रताप सरनाईक, भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यासह मोठय़ा संख्येने शिवसैनिक, पदाधिकारी तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

पंतप्रधानांचीही आदरांजली

‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली.  बाळासाहेब ठाकरे नेहमीच आपल्या आदर्शांवर ठाम राहिले. त्यांनी कधीही आपल्या विचारांशी फारकत घेतली नाही. तसेच सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी त्यांनी अविश्रांत मेहनत घेतली.’ असे ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहिली.

साहेबांसाठी परभणी ते शिवतीर्थ सायकलवारी

ग्रामीण भागातूनही शिवसैनिक आज स्मृतिस्थळावर आले होते. परभणी येथील एक शिवसैनिक सायकलवारी करून शिवतीर्थावर पोहोचले होते. सायकलवर भगवा झेंडा आणि शिवसेनाप्रमुखांची तसबीर त्यांनी लावली होती. साहेबांचा फोटो असलेला टी-शर्ट आणि डोक्यावर भगवी टोपी परिधान केली होती.

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, दिवाकर रावते, चंद्रकांत खैरे, महापौर किशोरी पेडणेकर आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी शिवतीर्थावर शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिस्थळी नतमस्तक होऊन आदरांजली अर्पण केली.

सौजन्य : दैनिक सामना 

 

 

Previous Post

खंदकखोर पाकड्यांनी 10 दिवसांत खणला सीमेपार जाणारा दुसरा बोगदा

Next Post

तब्बल 15 मेसेजिंग ऍप एकाच प्लॅटफॉर्मवर

Next Post
तब्बल 15 मेसेजिंग ऍप एकाच प्लॅटफॉर्मवर

तब्बल 15 मेसेजिंग ऍप एकाच प्लॅटफॉर्मवर

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.