जागतिक राजकारणावर प्रभाव टाकणारे ब्रिटनचे पंतप्रधान सर विन्स्टन चर्चिल यांच्या राजकीय कारकीर्दीला ८० वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांची ‘कार्टून बायोग्राफी’ प्रसिद्ध करण्यात आली. जगातील ‘सर्वोत्तम २७९ व्यंगचित्रकारांच्या’ या झळझळीत मांदियाळीत भारतातून फक्त बाळासाहेब ठाकरे हे एकच नाव होतं आणि त्यांची ही तीन व्यंगचित्रं त्या व्यंगचित्ररूप चरित्रात समाविष्ट आहेत.