बुल्गेरियातील भविष्यवेत्त्या बाबा वेन्गा यांनी 2021 बाबत केलेली भविष्यवाणी धक्कादायक आहे. मात्र, त्याचबरोबर या वर्षात ऐतिहासिक शोध लागून जीवनात आमुलाग्र बदल होतील, असे भाकीत त्यांनी 2021 बाबत वर्तवले आहे. तसेच या वर्षात जनतेचा आधात्माकडे आणि धार्मिकतेकडे ओढा वाढेल, असेही त्यांनी म्हटले आहे. युरोप आणि अमेरिकेचे महत्त्व कमी होणार असून चीन जगावर राज्य करेल आणि हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू होईल, असे भाकीतही त्यांनी केले आहे.
बाबा वेन्गा यांची ओळख बाल्कनच्या नास्त्रोदेमस अशी आहे. त्यांनी याआधी केलेल्या भविष्यवाणी तंतोतंत खऱ्या ठरल्या आहेत. 1911 मध्ये जन्म झालेल्या वेन्गा यांची वयाच्या 12 व्या वर्षी अचानक दृष्टी गेली. त्यांच्या 1996 मध्ये मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी त्यांनी अनेक भविष्यवाणी केल्या असून अनेक भाकीतेही वर्तवली आहेत. त्यांच्या अनेक भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत.
सोव्हियत युनियनचे विघटन, 9/11 चा अमेरिकेवरील हल्ला, प्रिन्सेस डायनाचा अपघाती मृत्यू, जपानची त्सूनामी याबाबतची त्यांची भविष्यवाणी खरी ठरली आहे. तसेच 2020 मध्ये जागतिक महामारी येईल, त्यामुळे दीर्घकाळपर्यंत जगावर परिणाम होईल, ही त्यांची भविष्यवाणी कोरोना महामारीमुळे खरी ठरली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठ्या आजाराला सामोरे जावे लागेल आणि त्यांना मोठा धक्का बसेल, हे त्यांचे भाकीतही खरे ठरले आहे. तसेच 5079 मध्ये जगाचा अंत होईल अशी भविष्यवाणीही त्यांनी केली आहे. त्यांनी केलेल्या भविष्यवाणींपैकी 90 टक्के भविष्यपाणी खऱ्या ठरल्याने त्यांनी 2021 बाबत केलेल्या भाकीतांबाबत उत्सुकता आहे.
2020 मध्ये आलेल्या महामारीचा 2021 मध्ये अंत होणार आहे. तसेच 2021 या वर्षात रशियाजवळच्या काही भागात उल्कापात होण्याचे भाकीत बाबा वेन्गा यांनी वर्तवले आहे. या उल्कापातामुळे नैसर्गिक संकटे ओढवणार आहेत. तसेच युरोपमध्ये रासायनिक हल्ले होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. आगामी काही काळात युरोपवर अनेक संकटे कोसळणार असून युरोपचे अस्तित्व संकटात येणार आहे. त्यामुळे युरोप आणि अमेरिकेचा जगावरील प्रभाव कमी होणार आहे.
युरोपसाठी हा खडतर काळ असून 2021 या वर्षात युरोपातील अनेक देशांना आर्थिस संकटांचा सामना करावा लागणार आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या हत्येचा कट आखण्यात येईल. देशातील सीमाभागात त्यांना धोका असल्याचे भाकीत त्यांनी केले आहे. 2020 प्रमाणेच 2021 मध्येही ट्रम्प यांना मोठ्या आजाराचा सामना करावा लागणार आहे. त्यात त्यांना बहिरेपणाही येऊ शकतो. तसेच त्यांना ब्रेन ट्रॉमचा धोका असल्याचेही बाबा वेन्गा यांनी नमूद केले आहे.
2021 या वर्षात नैसर्गिक संकटे वाढणार आहेत. सततच्या या घटनांमुळे जनतेचा आस्था, आध्यात्मिकता आणि धार्मिकतेकडे ओढा वाढणार आहे. त्याचा फायदा कट्टरतावादी घेणार असून धार्मिक तेढ वाढण्याची भीतीही त्यांनी वर्तवली आहे. तसेच मानवता धोक्यात येण्याच्या घटनाही घडतील. मात्र, त्यातून सुटका होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
2021 या वर्षात वैज्ञानिक आणि संशोधन क्षेत्रात मोठे यश मिळणार आहे. ब्रह्मांडात जीवन कसे सुरू झाले, याबाबतच्या संशोधनात महत्त्वाचे यश येणार आहे. तसेच जीवनिमिर्तीचे गूढ 2021 या वर्षात उलगडणार असल्याचे भाकीत त्यांनी केले आहे. या संशोधनामुळे आगामी 200 वर्षात पृथ्वीवरील व्यक्ती दुसऱ्या जगातील व्यक्तींशी संपर्क करू शकतील, असे महत्त्वाचे भाकीतही त्यांनी केले आहे.
सौर उर्जेच्या क्षेत्रातही जग मोठी झेप घेणार असल्याचे भाकीत बाबा वेन्गा यांनी केले आहे. सौर उर्जेवर चालणाऱ्या ट्रेनचा शोध 2021 मध्ये लागू शकतो, असे भाकीत त्यांनी केले आहे. त्यामुळे जगभरातून सौर उर्जेला चालना मिळणार असून पेट्रोलची मागणी घटेल, असेही त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे त्यांच्या या भाकीताबाबत जगभरात उत्सुकता आहे.
2021 या वर्षात एक विशालकाय ड्रगन जगभरावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. अमेरिका आणि युरोपचे वर्चस्व संपुष्टात येत ड्रगन जगावर राज्य करण्याच्या इर्षेने पुढे झेपावणार असल्याची भविष्यवाणी त्यांनी केली आहे. जगाला कलाटणी देणारी आणखी एक घटना 2021 मध्ये घडणार आहे. या वर्षात तीन मोठे देश एकत्र येणार आहेत, असे भाकीतही त्यांनी केले आहे. ड्रगन म्हणजे चीन असून तीन मोठे देश म्हणजे हिंदुस्थान, रशिया आणि चीन असल्याचे सांगण्यात येत आहे. 2021 या वर्षापासूनच हिंदुस्थानची महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
2021 या वर्षात कर्करोगापासून मानवाला मुक्ती मिळणार आहे. वैद्यकीय क्षेत्रात महत्त्वाचे शोध लागून मानवला कर्करोगावरील उपाय सापडेल आणि हा भयानक रोग इतिहासजमा होईल, असे भाकीतही त्यांनी केले आहे. आतापर्यंतची त्यांची भविष्यवाणी खरी ठरल्याने 2021 बाबतची त्यांची भविष्यावाणी किती खरी होणार याची चर्चा सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे 2020 मधील कोरोनाच्या महामारीची अंत होईल असे त्यांनी म्हटले आहे. त्याबाबत जगभरातून समाधान व्यक्त होत आहे. त्यांची ही भविष्यवाणी खरी ठरणार असे अनेक भविष्यवेत्त्यांनी म्हटले आहे.
सौजन्य : दैनिक सामना