सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणाऱ्या अभिनेता आरोह वेलणकर याने नुकतेच इन्स्टाग्रामवर आपल्या पत्नीच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमातले फोटो चाहत्यांशी शेअर केलेत. ‘रेगे’ सिनेमामुळे आरोह मराठी प्रेक्षकांच्या परिचयाचा आहे. त्यानंतर त्याने बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं. यातच मराठी ‘बिग बॉस-२’मधून त्याने पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकली. सध्या तो ‘लाडाची मी लेक गं’ या मराठी मालिकेत डॉ. सौरभच्या भूमिकेत दिसतोय. लवकरच तो बाबा होणार आहे. त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
छोट्या पडद्यावरचा हा मम्मीचा लाडला आता दोनच महिन्यांनी खऱ्या आयुष्यात बाबा होतोय. त्याच्या पत्नीच्या डोहाळे जेवणाचा शानदार कार्यक्रम नुकताच पार पडला. आपली दीर्घकालीन मारवाडी मैत्रीण अंकीता शिंघवी हिच्यासोबत त्याने तीनेक वर्षांपूर्वी विवाह केला आहे. अंकिता आणि आरोहची भेट कॉलेज कॅम्पसमध्ये झाली होती. सध्या दोघेही पतीपत्नी आनंदात जीवन व्यतीत करत आहेत. आरोहने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या डोहाळे जेवण सोहळ्याची छायाचित्रे पाहून चाहते खूश झालेच. ते त्यावर भरभरून दाद देत असून लाईक्सचा भडीमार करत आहेत.