अभिनेत्री अनुष्का शर्मा ही नऊ महिन्यांची गरोदर आहे. तिच्या प्रसूतीसाठी विराट कोहली पॅटर्निटी लिव्ह घेऊन ऑस्ट्रेलियावरून परत आला आहे. ते दोघे त्यांच्या घराच्या बालकनीत बसून गप्पा मारत असताना काही फोटोग्राफर्सने त्यांचा फोटो काढला. या फोटोवरून अनुष्का शर्मा भडकली असून तिने त्या फोटोग्राफरला चांगलेच सुनावले आहे.
अनुष्काने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये तोच फोटो पोस्ट करत सोबत आमच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करू नका, असे पोस्ट केले आहे. ”मी अनेकदा विनंती करून देखील फोटोग्राफर व प्रकाशन संस्था आमच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करत आहेत. कृपया हे सर्व तत्काळ थांबवावे’, अशी पोस्ट अनुष्काने शेअर केली आहे.
अनुष्का शर्मा ही गरोदरपणातही अॅक्टिव्ह असून शेवटच्या महिन्यापर्यंत ती जाहिरातीसाठी शूटिंग करत होती. अनु्काचा नववा महिना सुरू झाला असून पुढिल काही दिवसात कधीही तिची प्रसूती होऊ शकते. या काळात तिच्या सोबत राहण्यासाठी विराट कोहली ऑस्ट्रेलियावरून परत आला आहे