अभिनेत्री अनिता दाते हिला छोट्या पडद्यावर खूपच लोकप्रियता मिळाली आहे. त्यामुळे ती सतत मालिका वा जाहिरातींच्या शूटमध्ये व्यस्त असते. पण आपण घरी नसतो याची खंत तिला मनोमन सतावते. म्हणूनच तर तिने आपल्या लग्नाच्या वाढदिवशी इन्स्टाग्रामवर अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या पोस्टमध्ये ती चिन्मयला म्हणते, ‘मी घरी खूपच कमी वेळ देते तुला… म्हणून आपला संसार सुखाचा चाललाय…
‘मंडळी, जीवनातल्या आपल्या जोडीदारावरचं हेच तर प्रेमाचं प्रतीक असतं.’ यातूनच अनिताचे आपला पती चिन्मय केळकर याच्यावर किती प्रेम आहे ते जाणवतं. आपल्या पोस्टमध्ये अनिता दाते हिने पतीसोबत आपला फोटो शेयर केला आहे. अनिताची शुभेच्छा देण्याची ही आगळी पद्धत तिच्या चाहत्यांना खूपच आवडली आहे. तिने सोशल मिडीयाचा वापर आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी खूपच चांगल्या पद्धतीने केला आहे. म्हणूनच तर तिचे चाहते तिच्या या पोस्टवर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.