अभिनेता म्हटलं म्हणजे धावपळ, कठोर मेहनत, भूमिकेसाठी अभ्यास आणि त्यासोबतच स्क्रीनवर चांगले दिसण्यासाठीची धडपड… हे सर्व आलेच. अभिनेता अमर उपाध्याय हाही त्याला अपवाद नाही. सध्या तो कलर्स वाहिनीवर सुरू असलेल्या ‘मोलक्की’ या मालिकेत सरपंच वीरेंद्र प्रतापसिंह ही भूमिका करतोय. त्यालाही या सगळ्यासाठी वर्कआऊट करायचेच असते. पण शूटिंगच्या धावपळीत वर्कआऊटला तो वेळ काढू शकत नाही. म्हणून त्याने शूटिंगमध्येच दररोज दोन तासांचे दीर्घ वर्कआऊट होईल याची खबरदारी घेतली आहे. तो म्हणतो, माझे वर्कआऊट होईल याची आधी मी खात्री करतो आणि मग कितीही व्यस्त चित्रीकरणाचे वेळापत्रक असो, असे तो सांगतो. तो पुढे म्हणतो, ‘माझ्या फिटनेसविषयी मी जागरूक असतो. माझ्या संपूर्ण करियरमध्ये, मी माझ्या वर्कआऊटसाठी दरवेळी वेळ काढलेला आहे.
‘मोलक्की’साठी चित्रीकरण करत असतानाही मी क्रॉस ट्रेनिंग बँडस, डंबेल्स आणि इतर काही साहित्य माझ्यासोबत नेले होते. त्यामुळे टेकच्या मध्ये मला वर्कआऊट करता आले. मला माहीत आहे की हे थोडे जास्तच होत आहे पण योग्य शिस्तीसह जे करण्याची इच्छा असते त्यासाठी वेळ काढता येतो हेच मला दाखवायचे आहे’ असेही तो म्हणतो.