पश्चिम बंगालसह देशाच्या 4 राज्यात आणि एका केंद्र शासित प्रदेशात या वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. पाच राज्यात होऊ घातलेल्या निवडणुकीपैकी संपूर्ण देशाच्या नजरा प. बंगालवर लागल्या आहेत. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) च्या अध्यक्ष मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सरकार वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. तर लोकसभा निवडणुकीत जोरदार प्रदर्शन केल्याने विरोधी पक्षात असलेल्या भाजप (बीजेपी) ही हरतऱ्हेचे प्रयत्न करत आहे. प्रचार वेगात सुरू आहे. निवडणूक आयोगाने अजून विधानसभा निवडणुकीसाठी तारखांची घोषणा केलेली नाही. मात्र बंगाल मध्ये राजकारण सध्या तापलेलं आहे.
बंगालच्या मतदातांच्या डोक्यात कोण आहे? का चालत आहे? त्यांचा आशीर्वाद कोणत्या पक्षाला मिळणार, कोणाच्या डोक्यावर सत्तेचा ताज असणार, हे निवडणुकांनंतर स्पष्ट होईलच. मात्र एका सर्व्हेमध्ये मुख्यमंत्री ममता बनर्जींसाठी दिलासा देणारी बाब आहे. निवडणूक कार्यक्रमाच्या घोषणेपूर्वीच ‘सी वोटर’च्या सर्व्हेनुसार ममता बॅनर्जी यांच्याकडे पुन्हा सत्ता येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये हा अंदाज देखील व्यक्त करण्यात आला आहे की भाजपला देखील फायदा होण्याची शक्यता आहे.
सी वोटरच्या सर्व्हेमध्ये ममता बॅनर्जी यांच्या पक्षाच्या को वोट शेअरमध्ये दोन टक्के मतांची घट आणि 53 जागांचे नुकसान होण्याची शक्यता देखील वर्तवलेली आहे. एबीपी-सी वोटरच्या नुसार टीएमसीला 43 टक्के वोट शेअर सह 158 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर, भाजप जागांचे शतक पार करण्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. डावे पक्ष आणि काँग्रेसला मात्र फटका बसण्याची शक्यता दिसत आहे. त्यांचे वोट शेअर कमी होऊन 11.8 टक्के इतके होईल. तर जागा कमी होऊन 30 पर्यंत येण्याची शक्यता आहे.
सौजन्य : दैनिक सामना