• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

राखणदार

- प्रसाद ताम्हनकर (पंचनामा)

Nitin Phanse by Nitin Phanse
June 16, 2022
in पंचनामा
0

‘तर.. यशवर हल्ला का झाला आणि कोणी केला? ह्या शोधासाठी माझी नेमणूक झाली होती. यशच्या वडिलांच्या मृत्युपत्राने माझ्यासमोर काही काळ चकवा निर्माण केला होता. विशेषतः त्यातल्या शेवटच्या पॅरेग्राफने. मामांच्या मृत्यूपर्यंत मामा राखणदार, यशच्या मृत्यूनंतर डाकोरनाथ मंदिर मालामाल. पण महत्त्वाची गोष्ट जी बर्वेंनी लपवली, ती म्हणजे यशच्या मृत्यूच्या आधी जर त्याचे लग्न झालेले असेल, तर सगळी इस्टेट त्याच्या पत्नीला आणि मुलांना. हे वाचून काही काळ मी जरा गुंत्यात सापडलो की, हे हल्ले कोणाच्या फायद्याचे?
– – –

‘नमस्कार, मी अरविंद बर्वे. यशराज चौहान यांचा कायदेशीर सल्लागार.’
‘नमस्कार, मी सारंग दर्यावर्दी. कमिशनर साहेबांनी कळवले होते की तुम्ही येताय, बोला काय काम काढलेत?’
‘साहेब, काम जरा नाजूक आहे.’
‘अगदी बिनघोरपणे बोला. तुमची गोष्ट गुपित राहील ह्याची खात्री बाळगा.’
‘म्हणजे तशी आम्ही पोलीस तक्रार दिलेली आहे, पण तुमची देखील मदत मिळाली तर…’ बर्वे काही अजून मुद्द्यावर यायला तयार नव्हते. त्यांचे उगाच गोल गोल फिरणे बघून सारंग वैतागला.
‘बर्वे साहेब, तुमचे माझ्याकडे काम आहे आणि ते कसे सांगावे हा तुम्हाला प्रश्न देखील पडलेला आहे. जेवढा वेळ जास्त जाईल तेवढा कामाला उशीर होत जाईल.’
‘नाही तसे नाही.. खरे सांगायचे तर, माझे मालक म्हणजे मिस्टर यशराज चौहान यांच्या जिवाला धोका आहे आणि काही बरे वाईट होण्याआधी तुम्ही गुन्हेगाराला जेरबंद करावेत यासाठी मी तुमची मदत मागायला आलो आहे.’
‘पण तुम्ही पोलीस तक्रार दिली आहेत ना?’
‘साहेब, यशराज चौहान म्हणजे चौहान इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा. अब्जावधींचे मालक आणि मान्यवर हस्ती. अशावेळी तपास करताना, त्यांच्या आजूबाजूला तेवढ्याच तोलमोलाच्या असलेल्या व्यक्तींची चौकशी करताना पोलिसांना देखील मर्यादा पडतात,’ बर्वेंचा मुद्दा योग्य होता.
‘माझ्याकडून काय अपेक्षा आहे तुमची?’
‘तुम्ही तुमच्या पद्धतीने हे प्रकरण हाताळा. तुम्ही पोलीस नसल्याने कदाचित लोकं तुमच्याशी अधिक मोकळेपणाने बोलतील. माहिती देतील. एखादा धागा हाताला लागेल.’
‘पण ह्या प्रकरणात मी थेट चौकशी कशी करणार? मला वाटत नाही की तुम्ही उघडपणे माझी नेमणूक करणार आहात.’
‘खरे आहे तुमचे. रादर, तुमच्याकडे मी मदतीसाठी आलो आहे हे यशराज साहेबांना देखील माहिती नाही. पण इथेच तुमच्या बुद्धीचा खरा कस लागणार आहे सारंग साहेब. पडद्यामागून मी तुम्हाला सर्वतोपरी मदत करेन, पण उद्या जर काही बिनसले; तर मात्र मी हात वर करून मोकळा होईन.’
बर्वेंचा स्पष्टवक्तेपणा सारंगला आवडला. ‘ठीक आहे बर्वे साहेब. मला ह्या प्रकरणाची सविस्तर माहिती द्या.’
‘चौहान इंडस्ट्रीजचा कारभार किती मोठा आहे हे तुम्ही जाणताच. ह्या प्रचंड साम्राज्याचे मालक म्हणजे आमचे यशराज साहेब. लहानपणीच आईवडिलांचे छत्र हरपले आणि त्यानंतर त्यांचे सर्व पालनपोषण राघवदादांनी म्हणजे त्यांचे मामा राघव चौधरी यांनी केले. कुठल्याही प्रकारची दुःखाची सावली त्यांनी यश साहेबांवर पडून दिली नाही आणि कधी पालकांची उणीव देखील भासू दिली नाही. आजही सर्व कारभारात त्यांचा शब्द अंतिम मानला जातो. मात्र, यश साहेबांवर लागोपाठ झालेल्या हल्ल्यांनी ते देखील धास्तावले आहेत.’
‘हल्ले म्हणजे नेमके काय घडले? आणि तुम्हा लोकांचा कोणावर संशय?’
‘संशय तसा कोणावरही नाही आणि म्हणाल तर सगळ्यांवर आहे. आज चौहान इंडस्ट्री ज्या स्थानावर आहे, त्याच्या आसपास देखील कोणी नाही. त्यामुळे खूप मोठी स्पर्धा आहे, व्यवसायात शत्रू निर्माण झालेत असे देखील नाही. बरं, व्यवसायातल्या दुश्मनीमुळे हे हल्ले झाले म्हणावेत, तर हे हल्ले राघवदादांवर व्हायला हवेत, कारण सगळा कारभार ते बघतात, सर्व निर्णय ते घेतात.’
‘हे हल्ले कधी आणि कसे झाले?’
‘एकदा यशसाहेब बंगल्याबाहेर बागेत फिरत असताना त्यांच्यावर गोळी झाडली गेली; जी सुदैवाने फक्त दंडाला चाटून गेली. दुसर्‍या वेळी यशसाहेब बागेत असतानाच पुन्हा हल्ला झाला. झाडलेली गोळी ह्यावेळी त्यांना ज्यूस द्यायला वाकलेल्या जानकीला लागली. सुदैवाने तिचे प्राण वाचले.’
‘ह्याशिवाय इतर ठिकाणी कधी लहान सहान असे काही हल्ले? किंवा घातपात करण्याचा काही प्रयत्न?’
‘नाही! असे कुठेच काही यापूर्वी घडलेले नाही.’
‘ह्याचा अर्थ तुमच्या बंगल्याच्या आसपास अशी एखादी जागा आहे, जिथून तुमच्या बागेचा पूर्ण एरिया कव्हर होतो आणि कोणालाही संशय येणार नाही अशा ठिकाणाहून हल्ला करता येतो,’ शांतपणे सारंग म्हणाला आणि बर्वे त्याच्या तोंडाकडेच पाहत बसले. ’आहे.. पोराचे डोके अफलातून आहे..’ त्यांनी मनातल्या मनात सारंगला दाद दिली आणि योग्य व्यक्तीची निवड केल्याबद्दल स्वत:ची पाठ देखील थोपटून घेतली.
‘बर्वे साहेब, हे राघवदादा स्वभावाने..’
‘विचार देखील करू नका! त्यांच्यासारखा देवमाणूस शोधून सापडणार नाही. यशसाहेबांसाठी म्हणून त्यांनी लग्न देखील केलेले नाही. यश साहेब हेच त्यांच्या आयुष्य जगण्याचे ध्येय.’
‘आणि यशची संपत्ती..?’ कुत्सितपणे सारंगने विचारले आणि बर्वेंच्या चेहर्‍यावर एक संतापाची लाट उमटली.
‘मिस्टर सारंग, व्यवसायाच्या काही गरजा म्हणून मामांच्या नावावर थोड्या फार प्रॉपर्टीज आहेत. अन्यथा त्या माणसाला एका पैशाचा देखील मोह नाही. संपत्तीचे म्हणाल, तर आहे ते सगळे यशसाहेबांचेच आहे, मामा फक्त राखणदार आहेत; आणि महत्त्वाचे म्हणजे उद्या यश साहेबांना काही झाले, तर ही संपूर्ण मालमत्ता राजस्थानच्या डाकोरनाथ मंदिराला मिळणार आहे.’ ही माहिती ऐकून मात्र सारंग चांगलाच बुचकळ्यात पडला.
‘आणि हे सर्व मामांना माहिती आहे?’
‘शेवटच्या घटका मोजताना यश साहेबांच्या वडिलांनी जेव्हा हे मृत्युपत्र बनवले, तेव्हा त्याच्यावर साक्षीदार म्हणून पहिली सही मामांची होती!’ शांत आवाजात बर्वेंनी माहिती दिली.
—
‘सारंग तुझा काय विचार आहे?’ इन्स्पेक्टर राणाने टेबलावर नकाशा पसरत विचारले. अन ऑफिशियल का होईना पण सारंग ह्या प्रकरणात सहभाग घेतोय ह्याचाच राणाला आनंद झाला होता. सारंग काय किंवा धवल काय, दोघांबरोबर काम करताना त्याला कायमच मजा यायची. नवे डावपेच शिकायला मिळायचे.
‘राणा, मला हे प्रकरण साधे वाटत नाही. यश आता कुठे वीस वर्षाचा होतो आहे. धंद्यात तर त्याने अजून भाग घ्यायला सुरुवात देखील केलेली नाही. मामा सोडून त्याला रक्ताचा किंवा जवळचा असा एकही नातेवाईक नाही. त्याचे सर्व मित्र देखील तोलामोलाच्या घराण्यातील, सुसंस्कारी आहेत.’
‘एखादे पोरीचे लफडे?’
‘नाही.. मला तसे वाटत नाही. अर्थात शक्यता पूर्ण नाकारता येत नाही. एकच मिनिट थांब..’ राणाला मध्येच थांबवत सारंगने बर्वेंना फोन लावला. काही वेळ त्यांच्याशी चर्चा करून त्याने फोन ठेवला.
‘काय म्हणतायत बर्वे?’
‘यशचे लग्न वर्षभरापूर्वीच मित्तल ग्रूपच्या जवाहर मित्तलांच्या मुलीशी, अमलाशी ठरले आहे. दोन्ही घरांची आणि मुख्य म्हणजे यश आणि अमला या दोघांची ह्याला संमती आहे; रादर हे लव्ह मॅरेज आहे.’
‘च्यायला! मग घोडे अडलंय कुठे?’
‘यशचे आणि अमलाचे शिक्षण पूर्ण व्हावे यासाठी थांबले आहेत. दोन महिन्यांत साखरपुडा मात्र उरकून घेणार आहेत.’
‘ह्या बर्वेबद्दल काय मत आहे रे तुझे? साला कावेबाज वाटतो एकदम.’
‘कावेबाज तर तो आहे, पण असे काही उद्योग करणार्‍यातला वाटत नाही. तेवढे धाडस नाही त्याच्यात.’
‘पैसा भल्याभल्यांना धाडसी बनवतो मिस्टर दर्यावर्दी..’ हसत हसत राणा म्हणाला आणि दोघेही पुन्हा टेबलवर पसरलेल्या नकाशाकडे वळले.
‘राणा, मी काल हा पूर्ण परिसर फिरलोय. पोलिसांनी देखील दोन वेळा ह्या संपूर्ण परिसराची झडती घेतलेली आहे. गुन्हेगाराच्या दृष्टीने विचार केला, तर बंगल्याच्या डाव्या हाताची जेम्स बिल्डिंग हल्ला करण्यासाठी अत्यंत योग्य आहे. ह्या बिल्डिंगला मागे आणि पुढे असे दोन एन्ट्रेन्स आहेत, संपूर्ण इमारत काळ्या काचांची आहे.’
‘हम्म… तपास करायला लावतो लगेच.’ राणाने लगेचच चौकीला फोन लावला आणि ’जेम्स बिल्डिंग’ची संपूर्ण माहिती काढायला सांगितली.
‘राणा, ही अमला पोरगी कशी आहे रे?’
‘सगळ्याच श्रीमंतांच्या असतात तशी. अर्थात, आमच्याशी तिचे वर्तन चांगले होते. तिची माहिती काढली होती आम्ही, पण विशेष असे काही आढळून आले नाही. पब, पार्टी, शॉपिंग सगळ्या सवयी आहेत, पण व्यसन कशाचे नाही.’
‘व्हॉट अबाउट यश?’
‘सेम. हातात पैसा खेळतोय पण पोरगा वाया गेलेला नाही. आजही मामाच्या शब्दाबाहेर नाही. फारसे नाइट आऊट, उशिरापर्यंत हिंडणे, फिरणे असले काही शौक नाहीत. जे करतो ते मर्यादेत.’
‘राणा, यशवर दोन वेळा जो हल्ला झाला त्याच्या बुलेट्स मिळाल्या?’
‘मिळाल्या. दोन्ही एकाच पिस्टलमधून चालवण्यात आल्या होत्या. ‘डेझर्ट इगल. ४४ मॅग्नम.’
’काय?’ सारंग एकदम किंचाळला.
‘काय झाले बाबा एकदम? कधी नाव ऐकले नाहीस जणू..’
‘नाव ऐकले आहे; म्हणून तर शॉक बसलाय. राणा अरे, चार लाख किंमत आहे तिची. आणि माझ्या माहितीत तरी मुंबईतल्या एकाही सुपारीबाजाची येवढी ऐपत नाही किंवा कोणी ही पिस्टल वापरणारा माझ्या माहितीत नाही.’
आता राणा देखील चमकला. सगळ्या तपासात ही गोष्ट बरोबर त्याच्या नजरेतून सुटली होती. तेवढ्यात सारंगने मोबाईल काढला आणि बर्वेंचा नंबर फिरवला.
‘बर्वे, यशच्या जवळची माणसं, मित्र किंवा स्वत: यश यांच्यापैकी ’डेझर्ट ईगल’ पिस्टल कोणी वापरतं का?… काय? तुमची खात्री आहे?’ सारंग पुन्हा एकदा किंचाळला होता.
त्याचवेळी तिकडे राणाचा फोन देखील खणाणला. दोघांचेही फोन संपले तेव्हा दोघेही एकमेकांकडे सुन्नपणे पाहत होते.
‘डेझर्ट ईगल मित्तल वापरतात,’ खोलीतला तणाव वाढवत सारंग म्हणाला.
जेम्स बिल्डिंगचे वरचे दोन्ही मजले अनुक्रमे यशराज आणि मामांच्या नावावर आहेत..’ राणाने त्यावर कळस चढवला.
‘मी मित्तल आणि यशच्या मागे लागतो, तू मामा आणि अमलाची पुन्हा एकदा कसून माहिती काढ,’ सारंगने वाक्य पूर्ण करत असताना दरवाजा उघडला आणि तो बाहेर देखील पडला.
—
‘सारंग बोल.. आता उगीच टेन्शन वाढवू नकोस बाबा. मला मिळालेली माहिती आधीच डोक्याला शॉट लावणारी आहे.’
‘मग तूच सुरुवात कर आधी.’
‘मामा इज ऑल क्लीन. त्या माणसावर संशय घेण्यासारखी एकही गोष्ट नाही.मात्र यशच्या लग्नाबद्दल ते फारसे उत्साही मात्र वाटत नाहीत. अमला मात्र सध्या जरा विचित्र वागते आहे. फारशी मैत्रिणींमध्ये मिसळत नाही, सोशली अ‍ॅक्टिव्ह नाही. मे बी यशवर झालेल्या हल्ल्याचे परिणाम. पण त्यापेक्षा जास्ती महत्त्वाचे म्हणजे आपल्या एका खबरीने तिला परवा फ्रँकोबरोबर पाहिले होते.’
‘फ्रँको? तो ड्रग डीलर? जो आता पूर्णपणे सुधारलाय?’
‘मी त्याला उचलायला माणसे पाठवली आहेत. लेट्स सी.. तू बोल, तुझ्याकडे काय माहिती?’
‘शॉकिंग! मित्तल एका मोठ्या डीलमध्ये पूर्ण फसला आहे आणि त्याला पैशाची प्रचंड गरज आहे. मामांनी त्याला मदत करायला ठाम नकार दिला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, आपण डेझर्ट ईगल वापरतो हे मित्तलांनी मान्य केले; मात्र ती दाखवायला जेव्हा त्यांनी कपाट उघडले, तेव्हा ती नाहीशी झालेली होती.’
‘व्हॉट?’ आता किंचाळण्याची पाळी राणाची होती.
‘तुझे किंचाळणे आणि दचकणे थोडे राखून ठेव.’
‘का?’
‘माझ्या हाताला यशराजच्या तीर्थरूपांनी केलेल्या मृत्युपत्राची कॉपी लागली आहे. हे घे वाच..’
सारंगने दिलेले कागद राणाने घाईघाईने वाचले आणि प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिले. ‘यामध्ये नवे काय आहे? ही सर्व माहिती तर आपल्याला आधीच होती. इव्हन, बर्वेंनी देखील आपल्याला हेच सांगितले होते.’
‘बर्वेंनी माहिती सगळी खरी दिली, पण अर्धवट दिली. किंवा त्यांना जी लपवायची होती, ती व्यवस्थित लपवली.’
‘सारंग, कोणती माहिती म्हणतो आहेस? ह्या मृत्युपत्राप्रमाणे मामांचा ह्यात काही वाटा नाही आणि उद्या यशला काही झाले, तर आहे ते पण राहणार नाही. तहहयात फक्त राखणदारी करायची आहे मामांना.’
‘तहहयात आणि राखणदार.. किती योग्य शब्द वापरलेस.’
‘म्हणजे?’
‘म्हणजे, जोवर मामा जिवंत असतील तोवर प्रत्येक गोष्टीवर राखणदारी असेल आणि प्रत्येक शेवटचा निर्णय मामांचा असेल..’ डोळे मिचकावत सारंग म्हणाला आणि राणाची ट्यूब झटकन पेटली.
मामा नसतील तर फायदा कोणाचा? मित्तलचा, बर्वेंचा का कोणा तिसर्‍याचा?
—
जमलेले सर्वजण उगाचच चुळबुळ करत एकमेकांच्या तोंडाकडे पाहत होते. वातावरण एकदम गंभीर बनलेले होते. सारंग आणि राणा एकत्र आत आले आणि वातावरण जरासे निवळले.
‘आम्हा दोघांनाही, रादर, मिस्टर सारंग दर्यावर्दी यांना तुम्हा सर्वांशी काही बोलायचे आहे,’ राणाचे वाक्य संपले आणि सारंग उभा राहिला.
‘तुमच्यापैकी बर्वे साहेब आणि मित्तल साहेब सोडले, तर माझी कोणाशी ओळख नाही आणि तुम्ही लोक माझ्या कामाविषयी जाणून नाही. ह्या केसच्या संदर्भात तपासासाठी मला स्वत:च नेमल्याने बर्वे साहेब मला ओळखतात, तर मित्तल साहेबांना काही खास कारणाने मला माझी खरी ओळख करून द्यावी लागली,’ सारंगने मित्तलांकडे कटाक्ष टाकला आणि त्यांची अस्वस्थता उगाच वाढली.
‘…तर… यशवर हल्ला का झाला आणि कोणी केला? ह्या शोधासाठी माझी नेमणूक झाली होती. यशच्या वडिलांच्या मृत्युपत्राने माझ्यासमोर काही काळ चकवा निर्माण केला होता. विशेषतः त्यातल्या शेवटच्या पॅरेग्राफने. मामांच्या मृत्यूपर्यंत मामा राखणदार, यशच्या मृत्यूनंतर डाकोरनाथ मंदिर मालामाल. पण महत्त्वाची गोष्ट जी बर्वेंनी लपवली, ती म्हणजे यशच्या मृत्यूच्या आधी जर त्याचे लग्न झालेले असेल, तर सगळी इस्टेट त्याच्या पत्नीला आणि मुलांना मिळणार. हे वाचून काही काळ मी जरा गुंत्यात सापडलो की हे हल्ले कोणाच्या फायद्याचे? त्यात चौकशी करत असताना, मला मित्तल साहेबांच्या घरात भिंतीवर लावलेला हा फोटो दिसला आणि बर्‍याच प्रश्नांची उकल झाली. सारंगने त्या फोटोचा आपल्या मोबाइलमध्ये घेतलेला फोटो सर्वांना दाखवला आणि अमलाच्या चेहर्‍यावरचा रंग उडाला.
‘मामा? मित्तल? अमला की बर्वे? का मामा आणि अमला, मित्तल आणि बर्वे अशा जोड्या जमल्यात? की सगळेच सामील आहेत ह्या कटात? काही प्रश्न उलगडले आणि काही निर्माण देखील झाले.’ आता राणाने कथेत सहभाग घेतला.
‘या सगळ्या कोड्याचा गुंता सोडवत असताना, राणाने सहज ’राखणदार’ शब्द वापरला आणि मला ह्या गुंत्याचे टोक सापडले. त्यातच मित्तल आणि मामांमध्ये झालेल्या वादासंदर्भात कळले आणि मी जरा चमकलो. मित्तलांना चौधरी इंडस्ट्रीजची मदत हवी असेल, तर त्यांनी मामांचा काटा दूर करायला हवा; मग ते यशवर हल्ला का करत होते? म्हणजे मित्तल तर ह्यामागे नक्की नाहीत. मग त्यांचे पिस्टल त्यांना अडकवण्यासाठी वापरतंय कोण? त्याचवेळी कॉलेजच्या स्पर्धेत रायफलसह निशाणा घेऊन उभ्या असलेल्या अमलाचा फोटो दिसला आणि गुंता अर्धा सुटला. उरलेला अर्धा गुंता फ्रँकोने सोडवला. इतक्या जोड्या जुळवता जुळवता अमला आणि यशराज ही मानाची जोडी जुळली आणि सर्व गुंता सुटला,’ शांतपणे खाली बसत सारंग म्हणाला आणि त्याचवेळी मित्तल, मामा आणि बर्वे मात्र दचकून ताडकन उभे राहिले.
‘काय बोलताय काय तुम्ही?’ रागारागाने मामा ओरडले.
‘प्लॅन यशला मारण्याचा नव्हता राघव मामा, तुम्हाला मारण्याचा होता. आणि तोही रचला होता, ह्या तुमच्या लाडक्या भाच्याने आणि त्याच्या होणार्‍या बायकोने,’ राणा यशकडे रोखून पाहत बोलला.
‘तुम्ही शुद्धीत आहात का? वाटेल ते काय बरळताय?’
‘मामा, कधीकधी अति प्रेम, अति इमानदारी देखील माणसाच्या जिवावर उठते. यश मेला तर तुमच्या हातात करवंटी येणार होती, ह्याचाच दुसरा अर्थ म्हणजे तुम्ही जिवंत आहात तोवर यशच्या हातात करवंटी राहणार होती. त्यातून यश आणि अमला दोघांनाही ड्रग्जचे व्यसन लागलेले. तुम्ही तर पै पैचा हिशेब ठेवत होतात. पोरं मौजमजा करणार कशी? त्यातच मित्तल अडचणीत आले आणि अमलाकडचा पैशाचा ओघ देखील थांबला. या सर्वांतून सुटण्याचा एकच मार्ग होता, तो म्हणजे तुम्ही स्वर्गात जाणे. मग आपोआपच सारा पैसा, अधिकार यशकडे आले असते आणि मित्तलांना देखील मदत मिळाली असती. एका दगडात दोन पक्षी…’ आपले बोलणे थांबवत राणाने सारंगला पुढे बोलण्याची खूण केली.
‘मग पोरांनी एक अफलातून प्लॅन रचला. तुमच्या मृत्यूनंतर यशवर संशय येऊ नये, म्हणून आधी यशवर दोन हल्ले करण्यात आले. आता यशच्या जिवावर कोणीतरी उठले आहे, असा संशय निर्माण झाला. योग्य वेळ येताच तुमचा नंबर लावला की आपोआपच यशच्या जिवावर उठलेल्या रहस्यमय मारेकर्‍याकडे सर्वांच्या संशयाचा रोख वळला असता. अमलाचा तर कोणाला संशय देखील आला नसता. यश तर बिचारा स्वतःच दोनदा शिकार होता होता वाचलेला. प्लॅन तर अफलातून होता, फक्त वापरलेल्या बंदुकीच्या किंमतीने तुम्हा दोघांचा घात केला आणि ’राखणदार’ शब्दाने मला हात दिला!’ राणाच्या खांद्यावर हात मारत सारंग म्हणाला आणि हॉलबाहेर पडला.

Previous Post

अस्सल मुंबई भेळ

Next Post

भविष्यवाणी १८ जून

Related Posts

पंचनामा

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
पंचनामा

डिसीप्लिन

May 8, 2025
पंचनामा

टेक सपोर्ट नव्हे, लुटालूट!

May 5, 2025
पंचनामा

कर भला, तो हो भला!

April 25, 2025
Next Post

भविष्यवाणी १८ जून

बिनखात्याचा शपथविधी!

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.