बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राला शिवसेनाप्रमुख आणि हिंदुहृदयसम्राट म्हणून माहिती असले तरी कलावंतांसाठी मात्र ते अव्वल दर्जाचे कलावंत आणि कलावंत मनाचे उमदे रसिकही होते. त्यांच्या कुंचल्याच्या फटकार्यांतून बडेबडे सुटले नाहीत, त्यांच्या तलवारीसारखा सपकन् वार करणार्या रेषेने कधीही, कोणाचाही मुलाहिजा राखला नाही… पण बाळासाहेब रेषांच्या माध्यमातून जेव्हा दाद द्यायचे तेव्हा तीही किती राजस आणि लोभस असायची, त्याचं दर्शन घडवणारं हे अप्रतिम व्यंगचित्र प्रिक्षान… श्रीकांतजी ठाकरे यांच्या अत्यंत लोकप्रिय अशा सिनेमा परीक्षणाच्या सदराचं नाव सिनेप्रिक्षान असं होतं. त्यावरूनच हे नाव आलंय, हे उघड आहे. अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या ‘वार्यावरची वरात’ या बेहद्द लोकप्रिय नाटकावर खूष होऊन बाळासाहेबांनी त्यातल्या क्षणचित्रांची ही व्यंगचित्रात्मक वरात सजवली आहे… त्यांचं भरभरून कौतुक करून त्यांना ‘गॉड ऑफ विस्डम’ अशी पदवी दिली आहे… १२ जून रोजी पुलंची पुण्यतिथी. त्यानिमित्ताने त्यांना याहून मोठी आदरांजली कोणती असू शकेल.