• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

कुठे ‘खोदिशी’ काशी!

(संपादकीय - २८ मे २०२२)

Nitin Phanse by Nitin Phanse
May 26, 2022
in संपादकीय
0

कल्पना करा, २०२४ सालातील लोकसभा निवडणुकांची पूर्वतयारी सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणाला उभे आहेत… ते सांगत आहेत, आम्ही भ्रष्टाचार संपवला, ल्युटेन्स आणि खान मार्केट गँग संपवली, त्यांची राजेशाही राहणी संपुष्टात आणली. आमच्या सगळ्या आमदार-खासदारांना साध्या राहणीची शिकवण दिली. रुपयाची किंमत डॉलरच्या बरोबरीला आणली. सब का साथ, सब का विकास, या घोषवाक्याप्रमाणे जात धर्म न पाहता गरिबीतून सगळ्या भारताला बाहेर काढले. मानवी विकासाच्या सर्व निर्देशांकांमध्ये भारताला वरच्या स्थानाकडे नेले. येणार्‍या युगाची आव्हाने पेलायला सक्षम असलेली, इतिहासात रमण्याऐवजी भविष्य घडवायला सज्ज झालेली भावी पिढी आम्ही शिक्षण व्यवस्थेतून घडवली. दिल्या वचनाप्रमाणे आम्ही परदेशात दडलेला सगळा काळा पैसा बाहेर काढला, प्रत्येक करबुडव्या उद्योगपतीच्या मुसक्या बांधून त्याला फरपटत देशात आणले आणि त्याच्यावर खटला भरून तुरुंगात डांबले. यातून इतका पैसा जनतेसाठी उपलब्ध झाला की प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ लाखांच्या ऐवजी आम्ही २० लाख रुपये तर टाकू शकलोच, शिवाय जगात इंधनकिंमतींचा भडका उडालेला असताना आम्ही ४० रुपये लिटर दराने पेट्रोल आणि ३० रुपयांनी डिझेल देतो आहोत. सीएनजी तर पाच लिटरवर पाच लिटर फ्री आहे. भारताची ही प्रगती पाहून पाकिस्तान, बांगला देश, नेपाळ, श्रीलंका या शेजारी देशांमधली जनता त्यांच्या राज्यकर्त्यांना सांगत आहे की आपल्याकडे भारताइतका विकास करा किंवा आपला देश भारतात विलीन करून टाका…
…खुद्द मोदींच्या किंवा त्यांनी कपडे काढून घेतल्यावर अंतर्वस्त्रेही स्वखुशीने द्यायला तयार असलेल्या त्यांच्या भक्तांच्या स्वप्नातही हे भाषण दिसणे शक्य नाही, तर २०२४ साली मोदी असे भाषण करू शकतील, हे शक्य नाही… आज जे घडते आहे, त्यावरून अंदाज घ्यायचा तर पुढच्या वर्षापर्यंत देशात भोंगा, चालिसा, हिजाब, मंदिर, मशीद, ताजमहाल, कुतुबमिनार वगैरे वाद पेटवून धार्मिक अस्थैर्य निर्माण केले जाईल आणि निवडणुकांच्या आधी अयोध्येत भव्य राममंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा महिनाभर चालेल. त्या ३० दिवसांत ३००पेक्षा जास्त पेहराव बदलून मोदी यजमानाच्या नात्याने सहभागी होतील आणि त्याचे प्रक्षेपण थेट देशभर २४ तास चालवले जाईल.
हे सगळे करून मोदी पुढची निवडणूक जिंकतील की नाही, हा पुढचा विषय झाला… पण त्यांना हे करावे लागणार आहे, यातच त्यांच्या सर्व आघाड्यांवरच्या दारूण अपयशाची कबुली आहे… आपल्यापाशी देशाला पुढे नेण्यासाठी कसलीही योजना नव्हती, सर्वसामान्य संसारी भारतीयांच्या सुखदु:खांशी आपल्याला कसलेही देणे घेणे कधीच नव्हते, आपण राष्ट्रवादाची एक विदेशी कल्पना घेऊन या देशाच्या एकात्मतेला, संघराज्याच्या सर्वसमावेशक स्वरूपाला आणि संविधानिक बैठकीला नष्ट करण्यासाठीच सत्तेत आलो होतो आणि तेच कसे योग्य आहे, आपण आपल्याच देशातल्या एका समुदायाचा द्वेष करणे हीच कशी देशभक्ती आहे, हे आपण जास्तीत जास्त लोकांच्या गळी उतरवू शकलो, हीच आपली कामगिरी आहे, याची ती कबुली असेल.
तसे नसते तर अयोध्येतील राम मंदिराचा अपवाद वगळता सर्व धर्मस्थळांची स्थिती १९४७ साली (म्हणजे हा देश जन्माला आला तेव्हा) जशी होती, तशी ठेवण्याचा कायदा धाब्यावर बसवून आता काशी आणि मथुरेसह ठिकठिकाणी खोदकामे करून सगळ्या मशिदींखाली मंदिरेच होती, त्यामुळे आता तिथे मंदिरेच बांधली पाहिजेत, हा अट्टहास सुरू का झालेला आहे? काहींना यात वचनपूर्ती वगैरे दिसते. पण इतिहास आपल्या सोयीने खोदता येत नाही. तो खोदत खोदत मागे केलं तर मंदिरांखाली बुद्ध लेणी सापडतील, तिथे आपण काय करणार आहोत? अनेक बुद्ध विहार आणि लेण्यांचीच आज मंदिरे झाली आहेत, त्या देवताही आपण त्या त्या समाजाकडे सुपुर्द करणार आहोत का? आणि हे सगळे करून नेमके काय मिळणार आहे? या देशावर आक्रमण करणार्‍या राजवटींनी अत्याचार केले, हे खरेच; मंदिरे लुटली, हेही खरेच, पण ते करणारे फक्त परकीयच होते का? त्यांना आमंत्रण देऊन बोलावून घेणारे, त्यांना साथ देणारे, त्यांच्याबरोबर रोटीबेटी व्यवहार प्रस्थापित करून सत्तेच्या निकट राहणारे कोण होते? मुघलांना हिंदुस्थान बाटवायचाच होता तर त्यांची साम्राज्ये असताना आणि कोणीही प्रतिकार करण्याची शक्यता नसताना त्यांनी ते का केले नाही? छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जीव देणारा मदारी मेहतर होता आणि औरंगजेबाच्या वतीने त्यांच्यावर चालून येणारे मिर्झा राजे जयसिंग होते, ते कसे? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे भारतीय जनता पक्षाने आणि त्यांच्या परिवाराने चालवलेल्या खोदकामातून मिळणार आहेत का? मिळाली तर ती पुढे ठेवली जाणार आहेत का?
आपण विरुद्ध ते हा आपला लाडका खेळ असेल, तर त्यात आपला विजय झाल्यानंतर आपल्या आत लढाया सुरू होणार आहेत, जातीधर्मांच्या, तथाकथित उच्चनीचत्वाच्या, कर्मठ-अकर्मठांच्या… इतर देश मंगळावर चालले आहेत आणि आपण खोदकाम करत पृथ्वीच्या केंद्राकडे निघालो आहोत. त्यातून उसळणारा द्वेषाचा लाव्हा जातधर्म पाहणार नाही, तो सगळ्यांना जाळून नष्ट करणार आहे… काशी खोदत बसण्यापेक्षा हृदयातल्या भगवंताकडे पाहू, तो प्रेमाचा भुकेला आहे आणि बराच काळ आपल्या हृदयात द्वेषाशिवाय कशालाच जागा नसल्याने उपाशी आहे.

Previous Post

नया है वह…

Next Post

स.न.वि.वि.

Related Posts

संपादकीय

रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

June 8, 2023
संपादकीय

बारसू पाकिस्तानात आहे काय?

May 5, 2023
संपादकीय

आता राष्ट्रीय जनगणना कधी?

April 27, 2023
संपादकीय

पुढे काय होणार?

April 20, 2023
Next Post

स.न.वि.वि.

जनमन की बात

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.