• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

‘बनवाबनवी’चा ‘बेस्ट’ अवतार!

- संजय डहाळे (तिसरी घंटा)

चित्रसेन चित्रे by चित्रसेन चित्रे
April 21, 2022
in तिसरी घंटा
0

‘अशी ही बनवाबनवी’ हा गाजलेला चित्रपट आणि ‘ऑल द बेस्ट’ हे विनोदी नाटकांना नवी दिशा देणारे नाटक. या दोन्ही हास्यकलाकृतींचा जबरदस्त पगडा हा एकूणच ‘वाकडी तिकडी’च्या सादरीकरणावर असून त्याचं अजब मिश्रण हे या नाटकाच्या निमित्ताने लक्ष वेधून घेते. गतस्मृतींना उजळाही मिळतोय. रंगभूमीवरील्या ‘बनवाबनवी’चा ‘ऑल द बेस्ट’ अवतार म्हणजे ‘वाकडी तिकडी’चा आविष्कार!
– – –

एखादी वनलाईन पकडून त्यावर नाट्य रंगवितांना त्यात अस्सलपणा आणण्यासाठी जी काही जमवाजमवी आणि जुळवाजुळवी अगदी कथानकापासून करावी लागते, ती काहीदा तारेवरची कसरतही ठरू शकते. कारण कथानक हा नाटकाचा आत्मा आहे. तोच सजविण्याचा प्रयत्न हा ‘वाकडी तिकडी’ या नाटकातून करण्यात आलाय.
हिंदीतील ज्येष्ठ दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘बीबी और मकान’ या गाजलेल्या चित्रपटातून प्रेरणा घेऊन मराठीत ‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट बेतण्यात आला होता. लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन, अशोक सराफ, सुशांत रे यांनी त्यात धम्माल केली होती. ‘लग्न झालेले भाडेकरू असावेत,’ ही घरमालकाची अट हे चौघेजण कशी पाळतात, याची कथानकात कमाल होती. चित्रपट गाजला. तेच कथानक या नाटकात केंद्रस्थानी आहे. पण त्यासोबतच ‘ऑल द बेस्ट’ या नाटकातील अंध, मुका आणि बहिरा यांचीही जुळणी यात केलीय. त्यातून ही नवी ‘वाकडी तिकडी’ वाट आकाराला आलीय. महाराष्ट्राची ‘हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून रसिकांपर्यंत पोहोचलेले लेखक-दिग्दर्शक श्रमेश बेटकर यांनी रंगभूमीवर प्रथमच ही ‘नवी जत्रा’ साकार केलीय. तर कोकणातील अभय आणि अमित परब यांनी नाट्यनिर्माते म्हणून या नाटकापासून शुभारंभ केलाय. हाही योगायोग.
अजय, विजय, संजय- हे तिघे फाटके पण जिवलग दोस्त. त्यांना भाड्याने घर हवं आहे. शोधकार्य सुरू आहे. एका आलिशान बंगल्यात व्यवस्था होऊ शकते, पण एक अडचण. घरमालकाची अट आहे. ‘सामाजिक कर्तव्य म्हणून अपंग व्यक्तीलाच घर मिळेल आणि तेही फुकटात.’ मग हे तिघे दोस्त अंध, मुके, बहिरे बनतात. अपंगत्वाने नाटक रंगवतात. पण काहीदा भूमिकेत अदलाबदल होते. कसोटीचे क्षण उभे राहतात. नाटक फसले तर बंगल्यातून थेट बाहेर पडावे लागेल, याचे सदैव भय असते. अशा या बनवाबनवीत पालकांना बोलविण्याचा आग्रह घरमालक धरतात. त्यात संजय आत्याबाई बनतो. वेषांतर करून घरमालकापुढे उभा राहतो आणि मालकही त्याच्यावर फिदा! मग त्याची पळापळ. या बंगल्यात सचिन नावाचा एक अभ्यासू मुलगा एका खोलीत आहे तर अपंगांच्या जीवनशैलीचा अभ्यास करणारी तरुणी सुहानीही इथे अधूनमधून येते. या अपंगांशी संवाद साधण्याचा तिचा प्रयत्न असतो. अतिरेक्यांच्या शोधात इन्स्पेक्टर साजन इथे प्रगटतो. याच बंगल्यात एक चोरही घुसतो. अशा आठ वैशिष्ट्यपूर्ण पात्रांभोवती हा बनवाबनवीचा खेळ मस्त रंगतो. त्यात क्षणोक्षणी नाट्य भरलेलं. शेवटी एक धक्कातंत्र आणि अखेरीस सारं काही आनंदी आनंदात. ‘वाकडा तिकडा’ वाटणारा हा हसवणुकीचा रंगप्रवास कळसाला ताकदीने पोहचतो!
विनोदवीर अंशुमन विचारे याने संजयची भूमिका आणि दिग्दर्शन, अशा दुहेरी भूमिका पार पाडल्यात. नाटक, सिनेमा, रिअ‍ॅलिटी शो यातून घराघरात पोहचलेला हा गुणी कलाकार. ‘फु बाई फू’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ यातून त्याने हक्काचा रसिकवर्ग निर्माण केलाय. अपंगत्वाचं नाटक आणि आत्याबाई यातून त्याने हसे वसूल केलेत. दिग्दर्शक म्हणून प्रत्येक प्रसंगात रंगत वाढविण्याचा प्रयत्न दिसून येतो. विसरभोळ्या घरमालकाच्या भूमिकेत अनिल शिंदे यांची सहजता नजरेत भरते, तर सुहानी-हर्षदा बामणे हिने चांगली छाप पाडली आहे. भव्यदिव्य असा इन्स्पेक्टर साजन-अमिर तडवळकर शोभून दिसतो. अजिंक्य नंदा (सचिन), नरेंद्र केरेकर (चोर) यांनीही चांगली साथ दिलीय. उदय नेने यांचा अजय आणि सचिन वळूंज याचा विजय या दोघांनी ‘संजय’सोबतचे टायमिंग नेमके सांभाळल्यामुळे नाट्य एका उंचीवर पोहचते. आणि ही कॉमेडीची बुलेट ट्रेन सुसाट वेगात निघते. कलाकारांची अचूक निवड ही यातील जमेची बाजू ठरते. सार्‍यांनाच विनोदाची पक्की जाण असल्यामुळे संहितेतल्या मोकळ्या जागा दर्जेदार विनोदाने भरून निघतात. कथानकापेक्षा व्यक्तिरेखा अधिक लक्षवेधी ठरतात. त्यांच्या लपवाछपवीकडे रसिकांचे कायम लक्ष वेधले जाते आणि नेमकी हीच विनोदनिर्मितीसाठी मजबूत बाजू ठरते.
‘ऑल द बेस्ट’ नाटकामुळे भरत जाधव (मुका), अंकुश चौधरी (आंधळा), संजय नार्वेकर (बहिरा) असे तगडे ‘स्टार’ सिने-नाट्यसृष्टीला मिळाले त्यांची तुलना आणि आठवणही या निमित्ताने होते. इथे मुक्याला आंधळा बनावे लागते तर आंधळ्याला बहिरा. अशी ही विचित्र गुंतागुंत आणि त्यामुळे सुरू झालेल्या हसवणुकीचा कहर होतो!
एसटी डेपोतील टिपिकल भिंती आणि बंगल्यातील भव्य दिवाणखाना- या दोन्हीतून नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांनी हालचालींना पुरेशी जागा उपलब्ध केलीय. त्यात नेमकेपणा आहे. भिंतीवरल्या एकेक पाट्या; डावीकडे असणारा वर जाणारा जिना, समोर दोन खोल्यांचे दरवाजे सारं काही नेपथ्यरचनेवर गंभीरपणे विचार करून उभं केलेलं. सत्यजित रानडे यांचे संगीत आणि अमोद फडके यांची प्रकाशयोजना विनोदी प्रसंगाला पूरक ठरतात. पल्लवी विचारे यांची वेशभूषा आणि किशोर पिंगळे यांची रंगभूषा चांगली जमली आहे. ‘आत्याबाई’ सजविण्यात या दोघांची करामत आहे. आजकाल हमखास लाफ्टरसाठी आणि ओढून ताणून स्त्रीपार्ट घुसविला जातो. विनोदी कलाकारांची ती जशी पात्रताच बनलीय. पण इथे कथेची गरज दिसते. तांत्रिक बाजू चांगल्या जुळून आल्यात. सारेजण वातावरणनिर्मितीत मोलाचे सहकार्य बजावतात. निर्मितीमूल्यात कुठेही तडजोड केलेली नाही.
मालिकांच्या प्रभावामुळे आजकाल पडदा उघडतांना आणि पडताना गाणे जणू आवश्यक झाले आहे. यातही ‘टायटल साँग’ आहे. बरेचदा यातले शब्द, अर्थाच्या दृष्टीने महत्त्वाचे नसतात, पण तो ताल हातापायाचा ठेका धरायला भाग पाडतो. ‘जगण्याची वाकडी वाट, निघाला शोधायला रूम, इथून सुरू झालेली तिकडी…’ असं काहीसं ठेक्यात, जोमात सुरू होते. त्यात नाटकाच नाव ‘हॅमर’ करण्याचा ‘प्रयोग’ यशस्वी झालाय. तसेच काही जाहिरातीत बोलक्या व्यंगचित्रांचाही वापर करून नाटकाच्या विषयाची ‘मार्मिक’ता दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. जो कौतुकास्पदच.
नाटकाच्या दिग्दर्शकाला ‘कॅप्टन ऑफ द शिप’ असं म्हटले जातं. त्याचं एकूणच निर्मितीमागलं काम लाखमोलाचं असतं. इथे तर दिग्दर्शनासाठी दोन ‘कॅप्टन’ची युती आहे. दोघांचीही विनोदाची जाण पक्की आहे. मागणी तसा पुरवठा करण्याचा त्यांचा अनुभवही आहे. नाटकाचा आशय एकांकिकेसारखा मर्यादित असूनही त्याचे दोन अंकी रूपांतर करताना अनेक अडथळे या दोघांनी कुशलतेने पार केलेत जे कुठेही खटकत नाही किंवा गतीही कमी होत नाही. श्रमेश आणि अंशुमन या परीक्षेत बाजी मारतात.
कोरोनाच्या बंदीकाळानंतर रंगभूमीवर आलेल्या डझनभर नाटकांवर आणि त्यातील विषयांवर एक नजर फिरवली तर बहुतेक नाटके ही विनोदीच आहेत. रसिकांच्या तणावमुक्तीसाठी मनोरंजन, करमणूक, हास्यस्फोट ही वाट निवडली असावी. काही गंभीर विषयांनाही मनोरंजनाच्या चौकटीत बसवून विषय सादर झालाय. मनमुराद हसविण्यासाठीच नाटकाची निर्मिती असते, असा गैरअर्थ त्यातून निघू नये, नाहीतर ‘लाफ्टर क्लब’प्रमाणे ‘अति तिथे माती!’चे संकट उभे राहील. यावरही गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे.
‘अशी ही बनवाबनवी’ आणि ‘ऑल द बेस्ट’ यांचं अजब मिश्रण या नाटकातून लक्ष वेधून घेते. गतस्मृतींना उजळाही मिळतोय. रंगभूमीवरील्या ‘बनवाबनवी’चा ‘ऑल द बेस्ट’ अवतार म्हणजे ‘वाकडी तिकडी’चा आविष्कार!

वाकडी तिकडी

लेखन – श्रमेश बेटकर
दिग्दर्शन – श्रमेश बेटकर / अंशुमन विचारे
नेपथ्य – संदेश बेंद्रे
संगीत – सत्यजित रानडे
प्रकाश – अमोघ फडके
सूत्रधार – दीपक गोडबोले
निर्माते – अभय/ अमित परब
निर्मिती – समुद्रमंथन

[email protected]

Previous Post

‘रिअल इस्टेट ब्रोकर’ने ब्रेक दिला!

Next Post

घोडेबाजार

Related Posts

तिसरी घंटा

चिंतनशील विचारवंताचा नाट्यआलेख!

October 6, 2022
तिसरी घंटा

नाटकातलं नाटक `प्रशांत’ स्टाईल!

September 22, 2022
तिसरी घंटा

धम्माल बाळंतपणाचे हास्यकुर्रऽऽ!

September 8, 2022
पोरांनो, निसर्गाकडे चला…
तिसरी घंटा

पोरांनो, निसर्गाकडे चला…

August 25, 2022
Next Post

घोडेबाजार

मालवणी फिश करी

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.