प्रवीण दरेकर
त्यांची मजा बघता बघता
फुटलं मला हासू
पाय जाळ्यात अडकल्यावर
डोळ्यात आले आसू
किती बडबड केली तेव्हा
हात धुवून घेतले
मजूर म्हणून बाकी हसले
डबोल्यावरच बेतले
भाजपात आलो, पावन झालो
नाही कसली भीती
कोर्टाचीच धास्ती वाटते
करून टाकील माती
राज्यपाल कोश्यारी
जे जे सरकारकडून येते
ते ते परत पाठवत असतो
वरूनच तशा सूचना आहेत
दंड- बैठका मारत बसतो
लिहून दिलेले भाषणसुद्धा
फक्त अर्धाच कागद वाचला
आमचाच भाजप-संघ मेळा
ताळतंत्र सोडून नाचला
माझा सुद्धा विचार आहे
बसवावा का धोतर डान्स
संस्कृतीचा ताशा वाजवत
घंटा बडवून घ्यावा चान्स
पेन ड्राइव्ह
वाढला भाव अचानक माझा
राजकारण्यांचे झालो खेळणे
त्याच्या एडिटबाजी नुसार
खोट्याचेही खरे करणे
पूर्वी छान छान पिक्चर गाणी
भरून मला केले खूष
नंतर काय काय नको ते पाहतोय
सत्तेसाठी करती पुश
आता ब्लॅकमेल करण्यासाठी
केला जातो आमचा वापर
कशाकशात हे छुपे कॅमेरे
फुसके बॉम्बे फोडती भरभर
पुतीन
रशिया पुरविल भारताला
हवा तेवढा तेल साठा
सगळयांपेक्षा अगदी स्वस्त
तुम्ही फक्त XXX चाटा
केवढे उपकार केले तुम्ही
युनोमध्ये तटस्थ राहून
आम्ही तुमचे पांग फेडू
हवी तेवढी लाच देऊन
तुम्ही किती स्वाभिमानी
पाहिले आम्ही वेळोवेळी
शास्त्री गेले तेव्हाही तुमची
आळी मिळी गुप चिळी
केजरीवाल
पंजाब सोडून इतर ठिकाणी
कुठेच शिजली नाही डाळ
भाजप तिथे आहे दुबळा
आणि साचलाय इतर गाळ
युपी आणि इतर राज्यात
चालत नाही आपली झाडू
म्हणून `लक्ष्य’ ठेवले पंजाब
दिल्ली सख्याला नक्की फोडू
इसके लिये डोस्का चाहिये
नको अण्णाजींची नाटके
वीज-पाणी माफ करा ना
देतील मते गब्बर नि फाटके