‘काश्मीर फाईल्स’ या चित्रपटामुळे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होईल, निवडक मुद्द्यावर हा चित्रपट बनवण्यात आल्याची टीका केली जातेय. असं असताना काश्मीरमध्ये राहणार्या पंडितांना या चित्रपटाबद्दल नेमकं काय वाटतंय यासंदर्भात बीबीसी हिंदीने केलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
थोडक्यात या मुलाखतींमध्ये काय आहे?
केवळ चित्रपट बनवल्याने आम्हाला आमच्या मूळ घरी परत जाता येणार नाही, हा चित्रपट एकतर्फी आहे, या चित्रपटामुळे दोन समाजांमधील दरी वाढेल अशी वक्तव्यं या मुलाखतींमधून काश्मिरी पंडितांनी केली आहेत. या व्हिडिओत प्रातिनिधिक प्रतिक्रिया दाखवण्यात आल्या असून सर्वांनीच या चित्रपटामुळे काश्मिरी पंडितांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आल्याचं मान्य केलं आहे. मात्र, येथे मुस्लिमांच्याही हत्या झाल्या होत्या, शीखही मारले गेले होते, जे चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेलं नाही असं म्हटलं आहे. याशिवाय सर्वांनीच आमचा आतापर्यंत राजकीय हेतून वापर केला पण सध्या केंद्रात असणार्या सरकारनेही आमची मागील आठ वर्षांपासून दखल घेतलेली नाही असंही या काश्मिरी पंडितांनी म्हटलं आहे. हा चित्रपट म्हणजे २०२४ च्या निवडणुकीची तयारी असल्याची टीकाही एकाने केलीय.
कुठे घेण्यात आल्या या मुलाखती?
बीबीसी हिंदीने जम्मूमधील जगती टाऊनशिप येथे राहणार्या काश्मिरी पंडितांसोबत ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटासंदर्भात चर्चा केली. या ठिकाणी सध्या चार हजार स्थलांतरित काश्मिरी पंडित कुटुंब राहतात. केवळ एक चित्रपट बनवल्याने आम्हाला आमच्या घरी जाता येणार नाही असं इथल्या बहुसंख्य काश्मिरी पंडितांचं मत आहे. नेमकं कोण काय म्हणालंय पाहूयात…
इलेक्शनसाठीचा स्टंट वाटतोय हा चित्रपट…
‘हा चित्रपट म्हणजे २०२४ साठीचा इलेक्शन स्टंट वाटतोय. हे जगभरात जातील आणि म्हणतील की पाहा काश्मिरी पंडितांवर अत्याचार झालेत. पाकिस्तानने आम्हाला उद्धवस्त केलं. त्यांनी दहशतवादी घुसवले. त्यावेळी सामान्य मुस्लीम यामध्ये नव्हता. मुस्लिमांना पण मारण्यात आलंय,’ असं रोखठोक मत शादीलाल पंडित यांनी व्यक्त केलंय. मुस्लिमांनाही मारण्यात आलं जे चित्रपटात दाखवलेलं नाही‘ हा जो चित्रपट आहे तो योग्य आहे. काश्मिरी पंडितांवर अत्याचार झालाय. आम्हाला मारलं, खेचून नेण्यात आलं. तुम्ही काश्मीर सोडा अशा घोषणा दिल्या जायच्या. मात्र त्यात (चित्रपटात) हे सुद्धा हवं होतं की काश्मिरी मुसलमानांचीही हत्या करण्यात आली. ते या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेलं नाही,’ असंही शादीलाल पंडित म्हणालेत. ‘या काळामध्ये तिथे (काश्मीरमध्ये) ज्या शीख समुदायामधील लोकांच्या हत्या झाल्या दहशतवादामुळे, त्या या चित्रपटामध्ये दाखवण्यात आल्या नाहीत,’ याकडे शादीलाल पंडित यांनी लक्ष वेधलंय. आठ वर्षांमध्ये भाजपा सरकारनेही आमची दखल घेतली नाही‘ आठ वर्षांपासून त्याचं (भाजपाचं) सरकार आहे. ते इतर सरकारांना आरोप करायचे की त्यांनी काहीच केलं नाही, त्यांनी काश्मिरी पंडितांना उद्ध्वस्त केलं. मात्र या सरकारनेही आजपर्यंत आमची दखल घेतलेली नाही. काश्मिरी पंडितांचं आजही शोषण केलं जात आहे. केवळ काश्मिरी पंडितांना काश्मीरमधून काढलं, काढलं सांगितलं पण आमचं एकही काम केलं नाही,’ असंही शादीलाल पंडित म्हणालेत.
राजकीय टिश्यू पेपरसारखा आमचा वापर केला
१९९० पासून आजपर्यंत आमच्या नावाने केवळ चित्रपट बनवण्यात आले, बाकी काही झालं नाही. आजही हा चित्रपट तयार केल्याने ना माझी घरवापसी होणार, ना माझ्या देशातील लोकांचं काही समाधान होणार. ना माझ्या जम्मू-काश्मीरचं काही समाधान होणार. १९९० पासून आजपर्यंत आम्हाला एखाद्या पॉलिटिकल टिश्यू पेपरप्रमाणे वापरण्यात आलंय, आजही तेच होतंय,’ असं सुनील पंडित यांनी म्हटलं. १९९०मध्ये आम्ही येथून पलायन केलं. त्यालाही जबाबदार भारत सरकारच आहे.
दरी आणखी वाढणार
आज तुम्ही त्याला काहीही म्हणा पण मला वाटतं त्याप्रमाणे अशा प्रकारचे चित्रपट बनवले तर त्यामुळे दोन समाजात दरी निर्माण होईल,’ असं सुनील पंडित म्हणालेत. आम्हाला हेच दिसतंय की जी दरी आमच्यात निर्माण झालेल्या त्या मिटवण्याचा आम्ही जो प्रयत्न केला, लोकांना जवळ करण्याचा प्रयत्न केला त्याला या चित्रपटामुळे फटका बसेल आणि दरी पुन्हा वाढेल, कारण माझी (काश्मिरी पंडितांची) पाच हजार कुटुंब सध्या काश्मीरमध्ये आहेत,’ असं सुनील पंडित यांनी म्हटलंय.
एकतर्फी चित्रपट बनवण्यात आलाय…
‘हा जो चित्रपट बनवण्यात आलाय तो एकतर्फी असून आमच्या समाजावर प्रकाश टाकण्यासाठी केलीय. अजून एखादा चित्रपट निर्माता पुढे यावा त्याने दुतर्फी विचार करुन चित्रपट बनवावा,’ अशी मागणी प्यारेलाल पंडित यांनी केलीय.
दोन्ही बाजू मांडणारा चित्रपट बनवा…
‘मी त्याला बोल्ड म्हणजे जो दुतर्फी भूमिका ठेऊन जे हत्याकांड झालंय त्यावर एक चित्रपट बनवले. म्हणून मी इतर चित्रपट निर्मात्यांना विनंती करतो की दोन्ही बाजू मांडून त्यांच्यावरही जे अत्याचार झालेत ते आणि आमच्या जखमांवर प्रकाश टाकणारा चित्रपट बनवावा. म्हणजे जगाला पण कळेल की येथील बहुसंख्य लोकांवर येथे जे अत्याचार झाले ते नक्की कुठून आले होते. त्यांना पाकिस्तानचा पाठिंबा होता,’ असंही प्यारेलाल पंडित यांनी म्हटलंय.