‘झुंड’मध्ये संधी मिळाली असती, तर तुम्हाला कुणाची भूमिका करायला आवडली असती?
– जनार्दन शेंडगे, मलकापूर
अमिताभ बच्चन
काही देशांना युद्ध करण्याची खुमखुमी का येते?
– फातिमा शेख, अचलपूर
कारण कोरोना काम करू देईना आणि रशिया जेऊ देईना ही म्हण प्रचलित व्हावी म्हणून
‘होळी’ आणि ‘धुळवड’ तुम्ही कशी साजरी करता?
– यशवंत महाजन, कणकवली
दोन्हीतला फरक कळला तर नक्की कळवेन
तुम्ही एका वेळेला किती पुरणपोळ्या खाऊ शकता?
– रामदेव शाह, सांगली
बायकोला पुरणपोळ्या करता येत नाहीत
एखाद्या व्यक्तिरेखेसाठी धोतर नेसण्याची वेळ आली, तर काय काळजी घेता?
– बबन पाटील, बेळगाव
कासोटा नीट बांधतो
श्रीमंत माणसांचीही पैशाची हाव संपत का नाही?
– सायली कुलकर्णी, येरवडा, पुणे
अजून मिळू शकतो हे कळल्यावर कुणी का थांबेल?
अनेक बिनशिकलेली किंवा अगदी कमी शिकलेली माणसे समाजात नाव मिळवून जातात. मग शिक्षणाचा उपयोग काय?
– विनायक रानडे, वसई
शालेय शिक्षणाचा खरंच काही उपयोग होत नाही आपल्याकडे
स्त्रियांना मंगळसूत्रासारखे लग्न झाल्याचे ‘लायसन’ असते तसे पुरुषांना का नसते?
– तुषार साळवी, अकोला
कारण शील बायकांनी जपण्याची गोष्ट आहे हे थोतांड आपल्या ढोंगी समाजाने रूढ केल्यामुळे
घटस्फोटांचे प्रमाण आताच बेसुमार का वाढत चालले आहे?
– यामिनी सुरवसे, इस्लामपूर
कारण बायका पैसे कमावतात
भारताला जगातील आदर्श देश बनविण्यासाठी नेमके काय करावे लागेल?
– उल्हास घाटे, अक्कलकोट
सगळे सोशल मीडिया बंद करून टाकावेत… आणि घाम गाळायला लावलं पाहिजे
दहा पुरुष एकत्र गुण्यागोविंदाने राहू शकतात. पण त्यापेक्षा कमी स्त्रिया गुण्यागोविंदाने एकत्र का राहात नाहीत?
– शेखर काजरोळकर, भोईवाडा
कुचाळक्या थांबवत नाहीत
सोशल मीडियावर ट्रोल लोकांचा त्रास तुम्हाला कधी झाला आहे का? काय उपाय केला तुम्ही?
– श्रेणिक पाटील, सातारा
होय, पण तेच आहे शेणात दगड मारला की जे होणार ते होणारच…
हापूस आंबा इतका गोड कसा असतो?
– जनार्दन गोसावी, अमळनेर
अरे हो… खरंच की… असे प्रश्न पडत नाहीत लोकांना म्हणून भारत मागे राहिलाय.
नवर्या मुलाची वरात घोड्यावरून का काढतात?
– भावना बागल, काळा चौकी
घोडा नाही घोडी… गाईला आपल्यात देव मानतात म्हणून…
बायकोपेक्षा मेव्हणी बरी म्हणणारे लग्न ठरवताना तिलाच का नाही पसंत करत?
– गणेश मांढरे, वसई
कारण थोरलीच्या वेळी तिला लपवतात… आणि तसंही आपल्या ताटात पडलंय ते कधीच गोड लागत नाही…