लतादीदींच्या आवाजाची आणि गाण्याची नक्कल करणारे कलावंत, गायक त्यांचा उपमर्द करतात असं नाही वाटत तुम्हाला?
– श्वेता बगाडे, सदाशिव पेठ, पुणे
त्यात काय उपमर्द?… छान आहे की… त्यांचं प्रेम असेल तेवढं!
व्हॅलेंटाइन्स डे असतो तसा एखादा ब्रेकअप डे असायला काय हरकत आहे? कसा साजरा करता येईल तो?
– मीनाक्षी शिंदे, दहिसर
तुम्हीच सुचवा आणि तसा अनुभवही घ्या.
प्रेमात आणि युद्धात सारे क्षम्य असते, असं का म्हणतात?
– रोहित हिंगे, बुलडाणा
दोन्ही ठिकाणी मरणं हे अंतिम सत्य असतं, म्हणून.
मराठी आईवडील मराठी म्हणून अस्मिता जपण्याच्या गोष्टी करतात आणि मुलांना इंग्लिश मीडियममध्ये टाकतात, त्यांच्याशी इंग्लिशमध्ये बोलतात, त्यांनी परदेशात जाऊन सेटल व्हावे, असे त्यांना वाटते… हा विरोधाभास नाही का? यावर उपाय काय?
– स्नेहलता बाणाईत, फुरसुंगी
देशातली परिस्थिती बदलणे.
प्रेमात आणि युद्धात सारे क्षम्य असते, असं का म्हणतात?
– रोहित हिंगे, बुलडाणा
दोन्ही ठिकाणी मरणं हे अंतिम सत्य असतं, म्हणून.
पुरुषांच्या स्पर्धेप्रमाणे महिलांची आयपीएल स्पर्धा झाली तर महिला क्रिकेटला केवढे उत्तेजन मिळेल… तुमचे मत काय?
– ज्ञानेश्वर चव्हाण, हिंगणघाट
अजिबात मिळणार नाही… त्यांचा खेळ खूप प्रामाणिक असल्यामुळे त्यांना वाली नाही.
हिजाब आणि ‘जॉब’ यांच्यात महत्त्वाचं काय असलं पाहिजे लोकांसाठी?
– मुनव्वर हसन, मिरज
जॉब महत्वाचा असता तर हा प्रश्नच विचारला नसतात तुम्ही.
प्रेमविवाहांमध्ये घटस्फोटांचं प्रमाण जास्त का असतं?
बाळकृष्ण चोपडे, जळगाव
ज्याच्यासाठी लग्न केलं तेच उघड पडतं…
प्रेम आणि व्यवहार यांच्यात श्रेष्ठ काय?
असीम यंदे, सोमेश्वर नगर
प्रेमाने केलेला व्यवहार
पक्षी-प्राणी पैशाशिवाय किती उन्मुक्त, स्वच्छंद आणि सोपं आयुष्य जगतात. माणसाला मात्र पैशासाठी जिवंतपणी मरावं लागतं, खपावं लागतं. मग माणूस त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कसा?
रेखा दीक्षित, कराड
कारण त्याला तुम्ही म्हणताय त्या गोष्टी कळतात, पण वळत नाहीत.
जातीपातीत अडकलेला आपला समाज कोणत्या तोंडाने बंधुत्वाच्या गोष्टी करत असतो?
विनायक पाचारणे, भायखळा
दोन तोंडानी
वाईन आणि वाइफ यांच्यात साम्य-भेद काय आहेत?
किरण चौधरी, वसई
दोघी हळू हळू आपला अंमल दाखवतात. भेद- वाईन स्वीट-तुरट असते… वाइफ सुरुवातीला स्वीट आणि नंतर अगदी शेवटपर्यंत कडूच राहते…
तुम्हाला कोणी एक अब्ज रुपये दिले, तर तुम्ही त्या पैशांचं काय कराल?
हितेश बर्वे, कांजूरमार्ग
अनाथ मुलांसाठी वसतिगृह काढेन.
तुम्ही मराठी चित्रपटांमध्ये फार कमी वेळा दिसता? असे का?
प्रदीप मोरजकर, सावंतवाडी
माझ्या अभिनयाला घाबरतात.
तुम्ही बसल्या बैठकीला जास्तीत जास्त किती पुरणपोळ्या खाता आणि किती तुपाच्या वाट्या फस्त करता?
क्रिस्तोफर डिसूझा, विरार
मला आवडतच नाही पुरणपोळी…
लतादीदींचे गाणे आणखी किती वर्षे टिकेल, असे तुम्हाला वाटते?
शंकर परदेशी, यवतमाळ
जगाच्या अंतापर्यंत…