कलाकाराची विचारधारा आणि त्याची कला यांचा संबंध असावा काय? उदाहरणार्थ, तुम्हाला नथुराम गोडसेची भूमिका ऑफर झाली तर कराल काय?
– यतीन वैराळकर, पुणे
किती कलाकार मुळात विचार करतात… पैशासाठी आणि प्रसिद्धीसाठी वाट्टेल ते करणारी आमची जमात… पण कलाकृतीत नथुराम चुकीचा दाखवला गेला (जसा तो आहेच) तर नक्की करेन.
सोशल मीडिया हे वरदान आहे की शाप?
– गार्गी शेवते, बीड
तुम्ही त्याचा कसा वापर करता त्यावर अवलंबून आहे.
तुम्हाला नाटकात कधी प्रॉम्प्टरची गरज पडली आहे का?
– श्रीधर सोनटक्के, वैजापूर
नाही.
‘टाइमपास’ सिनेमातली सिच्युएशन आपल्या घरात निर्माण झाली तर तुम्ही मुलीचा बाप म्हणून कोणती भूमिका घ्याल?
– भीम टपले, अमरावती
मुलगी सज्ञान असेल तर स्वीकारेन.
‘पुष्पा : द राइझ’सारखा भव्यदिव्य, मसालेदार सिनेमा मराठीत का बनत नाही?
– आशुतोष बेल्हे, गोवा
आपण तेवढे सिनेमावेडे नाहीयोत.
तुम्हाला पाहिलं की अनुपम खेर यांची फार आठवण होते. त्यांच्या पदार्पणाच्या ‘सारांश’मधल्या वृद्धाची भूमिका तुम्ही समर्थपणे कराल, तुम्हाला रोहिणी हट्टंगडी यांच्यासारखी साथ कोण देईल?
– प्रभाकर झगडे, शिरगाव
लीना भागवत
एखाद्या आवडत्या अभिनेत्याचं दर्शन घडलं, भेट झाली तर आम्ही चाहते फार सुखावून जातो. तुम्ही स्वत: कलावंत आहात. तुमच्या वाटचालीत कोणत्या अभिनेत्याला भेटल्यानंतर असं कृतकृत्य वाटलं का तुम्हाला कधी?
– विलास घोडेस्वार, चंद्रपूर
कधीच नाही.
बस झाला अभिनयाचा नाद, कुठेतरी नोकरी करू, व्यवसाय करू, असं वाटलं नाही का आयुष्यात कोणत्या टप्प्यावर? वाटलं असेल तर टिकून कसे राहिलात?
– रॉनी डिसिल्व्हा, दहिसर
कधीच नाही वाटलं, कारण माझ्यात खूप चिकाटी आहे.
रंगमंचावर किंवा कॅमेर्यासमोर एखाद्या सहअभिनेता किंवा अभिनेत्रीच्या अभिनयाने तुम्हीच मंत्रमुग्ध झालात, असं झालं आहे का कधी? कोणाच्या अभिनयाने?
– तितिक्षा पडवळ, बेलापूर
सतीश तारे
चराचरात परमेश्वर भरलेला आहे, तर मग माणूस देवळात का जातो?
– आर्यन भोसले, भायंदर
चराचरात देव आहे आणि देवळातही देव आहे… हे सगळं कुभांड आहे.
कुणीतरी अशी पटापट गंमत आम्हा सांगील काय, या टोपीखाली दडलंय काय?
– अशोक परब, सातारा
हात घालून बघा!
देवाची प्रार्थना रोज लाउडस्पीकरवरून का ऐकवावी लागते? देव बहिरा आहे का?
– उन्मेश जोशी, डोंबिवली
धर्म, देव हे मानवरचित आहेत, त्यामुळे या विषयावर जेही प्रश्न विचाराल ते माणसाच्या ढोंगाशी संबंधित आहेत हे लक्षात ठेवा.
‘दगा दगा वई वई वई’ या गाण्यातल्या ‘वई वई वई’ या शब्दांचा अर्थ काय?
– मंदार तांबे, प्रभादेवी
मला नाही माहित, तुम्हाला कळला तर मलाही सांगा…