• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

पोक्यासाठी काय पण!

- टोक्या टोचणकर (टोचन)

टीम मार्मिक by टीम मार्मिक
January 31, 2022
in टोचन
0

पौष संपला की माझा मानलेला परमप्रिय पोक्या याच्या लग्नाचा बार धुमधडाक्यात उडवून द्यायचा बेत मी ठरविला आहे. तोपर्यंत कोरोनाची तिसरी लाटही ओसरेल याची मला खात्री नव्हे तर विश्वास आहे. नंतर विसरायला नको म्हणून मी पोक्याच्या लग्नाचा सारा प्लॅन एका नववर्षाच्या कोर्‍या करकरीत डायरीत लिहून काढला आहे. त्याशिवाय दररोज त्या डायरीत आठवतील तशा नोंदी करतच असतो. मात्र त्याचा पत्ता पोक्याला लागू देत नाही. कारण पैशाच्या बाबतीत तो खूप हळवा आहे आणि स्वत:च्या लग्नासाठी वायफळ खर्च करणे त्याला आवडणार नाही. मला खोदून खोदून विचारल्यावर मी त्याला मागेच स्पष्ट शब्दात सांगितले होते की लग्नात तुझा एकही पैसा खर्च होणार नाही याची जबाबदारी माझी. जरी दीड-दोन कोटी खर्च आला तरी तू अजिबात लक्ष द्यायचे नाही की टेन्शन घ्यायचे नाही. कारण पैसा थोडाच आपल्या बापाचा आहे! आपण कितीही पैसा खर्च करू शकतो. कारण आजपर्यंत आपण दोघांनी मिळून इतक्या खंडण्या वसूल केल्या आहेत की दाऊदच्या फंटरनाही तेवढ्या वसूल करता आल्या नसतील आणि तिरकिट भूमय्या यांचा ईडी वरदहस्त असल्यावर तर चिंताच नको. ईडीची नाडी दिल्लीवरून त्यांच्याच हाती दिली आहे.
आजपर्यंत कोणीही काढली नसेल अशी सोन्याचा मुलामा दिलेली प्लॅटिनमची आकर्षक लग्नपत्रिका मी बनवण्यास देणार आहे. ती मिनी ब्रीफकेससारखी असेल. आत आकर्षक कप्पे असतील. मोठ्या पहिल्या कप्प्यात अर्थात लग्नपत्रिका दुसर्‍या कप्प्यात सेंटची बाटली, तिसर्‍या कप्प्यात दोन उंची मद्याच्या विदेशी क्वार्टर, चौथ्या कप्प्यात सुगंधी सुपारीची डबी, पाचव्या कप्प्यात पाव किलो चकणा, सहाव्या कप्प्यात काचेचा अनब्रेकेबल ग्लास, सातव्या कप्प्यात सोन्याचा वर्ख दिलेला अक्षतांचा बॉक्स, रिटर्न गिफ्ट म्हणून आकर्षक भेटवस्तू असणारच आहे. सगळ्या वस्तू माझे मित्र `स्पॉन्सर’ म्हणून पुरवणार आहेत. कोरोनाचे निर्बंध तेव्हा उठलेले असतील आणि कोरोनाने देशातून पळही काढला असेल. त्यामुळे या लग्नाची तशी काळजी मला मुळीच नाही. तसे आमच्या गँगचे मेंबर्स माझ्याबरोबर मदतीला असतीलच.
लग्नासाठी मी मुंबईतील कोणतेही मैदान केव्हाही बुक करू शकतो, कॅटररला देशाच्या प्रत्येक राज्यातील खाण्याच्या पदार्थाचे स्टॉल मैदानाच्या आतील बाजूच्या कडेला लावायचे आहेत. स्टेजच्या डाव्या बाजूला ऑर्वेâस्ट्रा सुरू असेल आणि उजव्या बाजूला सुरेल बँड. त्याशिवाय मैदानभर कडेकडेने भारतीय आणि पाश्चात्य नृत्याची धूमधाम असेल. मैदानभर पार्टीसारखी गोल टेबले आणि सभोवताली चार खुर्च्या असा थाट असेल. बाकी खाण्यापिण्याची रेलचेल असेल. महाराष्ट्राचे सर्व मंत्री, खासदार, आमदार, दुबईतील आमचे काही खास मित्र यांना निमंत्रण असेल. पोक्यासाठी मोदींसारखा लांबलचक सोन्याचा वर्ख असलेला कोट, सुरुवार, रत्नजडीत बूट म्यानमारला बनवायला दिले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळातील एक मंत्री आणि त्याची दोन मुले वगळता बाकी नेत्यांना आमंत्रण देणार आहे. माझ्यातर्पेâ पोक्याला मोदींनी अलिकडे घेतली तशी नवीन मर्सिडीज मेबॅक एस ६५० गार्ड ही बारा करोडची पॉश बुलेटप्रुफ गाडी भेट म्हणून देण्यात येईल. आता आलेल्या नव्या मॉडेलमध्ये त्या गाडीला वर
हेलिकॉप्टरसारखा पंखाही आहे. म्हणजे गरज भासल्यास तिचे हेलिकॉप्टरमध्येसुद्धा रूपांतर करून आकाशात विमानासारखे उडता येईल. सगळ्या सोयी त्यात असतील.
आता मी फक्त लग्न लावणार्‍या उत्तम गुरुजींच्या शोधात आहे. त्यासाठी जाहिरातही दिली आहे, त्यांचे इंटरव्ह्यू मीच घेणार आहे. एकच भटजी न निवडता चौघांची निवड करणार आहे. प्रत्येकाला कामे वाटून दिलेली असतील. त्याशिवाय पोक्याच्या लग्नाच्या निमित्ताने वधु-वरांची नावे गुंफलेली मंगलाष्टकांची स्पर्धाही पेपरात जाहीर करणार आहे. उत्तम पाच विजेत्यांना प्रत्येकी लाखाचे बक्षीस तसेच तिरकिट भूमय्या यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पोक्या-पाकळी शुभविवाह ट्रॉफी देण्यात येणार आहे. पोक्याला मात्र यातले काहीही सांगणार नाही. कारण त्याला श्रीमंती थाट अजिबात आवडत नाही. मलाही तो खरं तर आवडत नाही. पण पोक्यासाठी मी काहीही करेन. कारण पैसा काही माझ्या खिशातला नाही. आणि कसलीच धाड पडण्याची अजिबात भीती नाही. नाहीतरी पत्र्याच्या चाळीत राहणार्‍या आमच्यासारख्यांच्या जीवनात असे थाटामाटाचे प्रसंग कधी येणार?
पोक्यासारखा लग्नाचा विचार मी आयुष्यात कधीच करणार नाही. पोक्याच्या नशिबातच विवाहाचा योग होता म्हणून त्यातून त्याची सुटका होणार नाही. त्यामुळेच त्याला अचानक लग्न करण्याचा साक्षात्कार झाला. माझ्या बाबतीत तसे काही कधीच होणार नाही. कारण पोक्या दिसायला माझ्यापेक्षा देखणा आहे. त्याशिवाय डेअरिंगबाज आहे. त्याशिवाय त्याला त्याच्या मनासारखी पत्नी लाभणार आहे.
पोक्याची नियोजित पत्नी पाकळी हिला तर लग्नात मर्‍हाटमोळ्या पेहरावांनी आणि दागिन्यांनी मी नखशिखांत मढवून टाकणार आहे. मराठमोळी सोन्याचा मुलामा दिलेली पैठणी खास बनवायला दिली आहे. त्याशिवाय सोन्याचा कमरपट्टा, सोन्याचे बाजूबंद, सोन्याचे पैंजण, सोन्याच्या पाटल्या, सोन्याचे तोडे, सोन्याचा चंद्रहार आणि वीस तोळ्याचे मंगळसूत्र बनवायला टाकले आहे. त्याशिवाय सोन्याची फुलांच्या पाकळ्यांसारखी कर्णफुले, सोन्याची नक्षीदार बिंदी, हातात कोपरापर्यंत सोन्याच्या बांगड्या असं काय काय हैद्राबादच्या सोनपाकळी ज्वेलर्सकडे बनवायला दिलं आहे. दीर म्हणून माझे ते कर्तव्यच आहे.
वरात हत्तीवरून काढायची की घोड्यावरून एवढाच सवाल उरला आहे. तो सुटेलच. त्याशिवाय या पती-पत्नीना हनिमूनसाठी स्वित्झर्लंडला पाठवायचे की ऑस्ट्रेलियाला हाही प्रश्न सोडवायचा आहे. शेवटी थंडगार हवेत दोघं गारठून जायला नको. नाहीतर बोलणी मला खायला लागायची. सध्या बाकीचे सगळे धंदे बंद ठेवले आहेत. एकदा तिरकिट भूमय्याशी बोलून घेतो आणि सारे फायनल करतो. शेवटी प्रश्न पोक्या आणि पाकळीच्या समाधानाचा आहे. त्यामुळे आता जोरात तयारीला लागायला हवे!

Previous Post

२९ ते ५ फेब्रुवारी भविष्यवाणी

Next Post

नया है वह…

Related Posts

टोचन

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
टोचन

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025
टोचन

माननीय भुसे यांचे आत्मवृत्त

May 5, 2025
टोचन

अपमान! अपमान!! अपमान!!!

April 25, 2025
Next Post

नया है वह...

नवटाकबाजांची नौटंकी!

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.