• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

एक वेगळी कल्पना : दुष्मन

- शुद्ध निषाद (सिनेप्रिक्षान)

टीम मार्मिक by टीम मार्मिक
December 18, 2021
in सिने प्रिक्षान
0

तसा ‘दुष्मन’ भारतीय चित्रपटसृष्टीत यापूर्वी तीनदा येऊन गेलाय. एकदा १९३९ला, नंतर १९५०ला, नंतर १९५९ साली. साली खिट् खिट् आहे! पुन्हा साला आला १९७२ साली! ‘मेरा साया’ नि ‘चिराग’ काढणार्‍या प्रेमजी भाईंनी साल्याला आणला. मी साला एकदा गेलो होतो सेटवर. तर मी काय सांगत होतो साला! माफ करा हं मी तुम्हाला साला नाही म्हटलं, पण ‘आदत से मजबूर है’ म्हणतात ना? काय? मी शिवी दिली? साला काय शिवी आहे काय? साला म्हणजे मेव्हणा! आणि काय हो राजेश खन्ना सारखा साला म्हणतो ते चालतं का? नाही, मुंबईत कोण साला ‘साला’ म्हणत नाही? पोरीसुद्धा बोलू लागल्यात. मुमताज नाही का बोलली? जाऊ द्या. सालं हे असंच आहे!
तुम्हाला विरेंद्र सिन्हा माहीत आहेत ना? काय? छे हो असं काय करता? माला सिन्हाचे ते कुणीही लागत नाहीत. राज कपूरचा ‘कल, आज और कल’ची ष्टोरी यांचीच. आणि दुष्मनची ष्टोरी यांचीच.
राजेश खन्ना एक ट्रक ड्रायव्हर, जो बेवडी पिऊन ट्रक ‘रॅश’ चालवतो. त्याच्या ट्रकखाली एक शेतकरी सापडतो. कोर्टासमोर त्याला उभं केलं जातं नि कोर्टातले न्यायाधीश एक नवं तंत्र म्हणून त्याला दोन वर्षांची कारावासाची शिक्षा न देता जिथे तो माणूस मेला त्या गावात जाऊन, त्याच्या घरात राहून त्या मेलेल्या माणसाच्या संसाराची जबाबदारी सांभाळायची शिक्षा देतात. हा कैदी दुष्मन म्हणून तेथे जातो. गाव त्याला आपलासा करत नाही ना त्या शेतकर्‍याच्या घरातले! शेतकर्‍याच्या घरात त्याची विधवा बायको, दोन कच्ची बच्ची. एक लंगडा बाप, आंधळी आई नि शादी ठरलेली, पण पैशापाई रखडलेली बहीण. त्यांच्यावर अनेक प्रसंग असे येतात की सार्‍यांना तो आपल्या पराक्रमाच्या जोरावर फक्त शेतकर्‍याची बायको सोडून आपलेसे करतो. पण शेवटी भाभीवरही बलात्काराचा प्रसंग येतो तेव्हा हा आपल्या ‘जान’ची बाजी लावतो नि भाभीसुद्धा ‘देवरजीऽऽऽ’ अशी हाक मारते तेव्हा त्याच्या आत्म्याला शांती मिळते.
ड्रायव्हरची शिक्षा संपलेली असताना काय निर्णय घ्यायचा हे त्याने ठरवायचं असतं. कारण तो स्वतंत्र असतो. त्याने न्यायाधिशाकडे जाऊन सांगण्याची गरज काय? आणि जो शिक्षा देतो तोच न्यायाधीश पुढे सर्व काही करू शकतो काय? इतकंच नव्हे तर तो ‘कलेक्टर’ कसा बनू शकतो? शेतकर्‍याचा लंगडा बाप नि विधवा बायको न्यायाधिशाकडे येऊन जे सांगतात ते पटत नाही. इतकंच नव्हे तर न्यायाधिशाने एखाद्याला अशा प्रकारची शिक्षा ठोठावावी हेसुद्धा विचित्र वाटतं.
राजेश खन्ना याच्या भोवती कॅमेरा सतत फिरलाय कारण तो पडद्यावर ‘दुष्मन’ असला तरी रसिकांना ‘प्यारा’ आहे. त्याने काम मात्र झकास केलंय. त्याला साथ दिलीय मुमताजने. मीनाकुमारीने शेतकर्‍याच्या विधवा पत्नीमध्ये अनोखे रंग भरलेत. तिला अ‍ॅक्टिंग करायची गरज नाही. डोळे बोलतात. अन्वर हुसेन, सज्जन, कन्हैयालाल, नाना पळशीकर, नाझ, अभी भट्टाचार्य, रेहमान यांनी आपल्या भूमिकेला न्याय दिलाय.
दिग्दर्शनात दुलाल गुहा यांनी काळजी घेतलेली नाही. ही चूक त्यांच्या असिस्टंटची. नाना पळशीकर प्रथम उजव्या पायाने लंगडे असतात नि शेवटी डाव्या पायाने कसे होतात? अशा ढोबळ चुका त्यांनी ठेवल्यात.
थोडक्यात, अशक्य गोष्ट असली तरी ती पडद्यावर एक कल्पना म्हणून दाखवली असल्यामुळे नि तुम्हीसुद्धा त्या दृष्टीकोनातून पाहिल्यास अगदी लहान मुलं टारझन पहातात तसा तुम्हाला हा दुष्मन प्यारा वाटेल.

Previous Post

स्थलांतरित पक्ष्यांच्या अधिवासावर संक्रांत!

Next Post

वात्रटायन १८ डिसेंबर

Next Post

वात्रटायन १८ डिसेंबर

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.