• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

मला लागली ईडीची उचकी!

- टोक्या टोचणकर (टोचन)

टीम मार्मिक by टीम मार्मिक
November 24, 2021
in दिवाळी 21 धमाका
0

माझ्यावर ईडीची धाड अजून कशी पडत नाही या काळजीने मी अंथरुण धरले होते. आज येतील, उद्या येतील म्हणून मी आढ्याला डोळे लावून विचार करत खाटेवर पडलो होतो. रस्त्यावर पोलिसांच्या जीपचा सायरन वाजला की मला उगाचच ईडीचे अधिकारी आल्याची चाहूल लागल्याचे भास व्हायचे. एकेकाळचा विभागातला दादा आणि आता अनेकांच्या दृष्टीने गडगंज संपत्तीचा मालक असल्यामुळे `ईडी’ची धाड घरावर नक्की पडणार याची मला पूर्ण खात्री होती. दरवाजाचा थोडा जरी आवाज झाला तरी मला ईडीवाले आल्यासारखे वाटायचे. मला पकडण्यात त्याची काही चूक असेल असे मला अजिबात वाटत नव्हते. कारण माझी संपत्तीच इतकी आहे की नुसती स्थावर आणि जंगम मालमत्ता मोजायला या ईडीवाल्यांना कमीतकमी एक महिना लागेल. शिवाय माझे मुंबईतल्या प्रत्येक खात्यात किमान दीड कोटी रुपये आहेत. माझे एक कपाट तर वरपासून खालपर्यंत पासबुकांनी भरलेले आहे. प्रत्येक बँकेत सोन्याच्या चिपांचे लॉकर आहेत. त्यांना सोन्याच्या विटा म्हटले तरी चालेल. त्याशिवाय स्विस बँकेत अफाट पैसा आहे तो वेगळाच.
आता ईडीवाले म्हणतील की एवढा पैसा यांच्याकडे आला तरी कुठून? शिवाय जवळजवळ सर्व विदेशांतील बँकेमध्ये माझा काळा पैसा म्हणजे ब्लॅक मनी आहे. म्हणून माझ्यावर सर्वात आधी ईडीची धाड पडेल याबाबत मला अजिबात शंका नव्हती. तरीही `वाट पाहूनि जीव शिणला, दिसामागुनी दिस सरला’ असेच आजपर्यंत चालले आहे. माझा मानलेला परममित्र पोक्या याला हा सर्व तपशील माहीत आहे. वारसदार म्हणून मी त्याचेच नाव दिले आहे. शिवाय तिरकिट भूमय्या यांनाही पोक्या माझ्या संपत्तीबद्दल नऊ महिन्यापूर्वी बोलला होता. नेमके तिरकिटने तेच लक्षात ठेवून हा आपल्या पक्षाच्या फायद्याचा माणूस आहे, हे लक्षात ठेवून मला हात लावला नसावा, असा माझा अंदाज आहे.
परवाच मी पोक्याच्या सांगण्यावरून तिरकिट भूमय्याला फोन केला होता आणि मला कधी उचलणार अशी विचारणा केली होती. तेव्हा तो म्हणाला, तुझ्यासारखी प्रामाणिक माणसे जर आमच्या पक्षात असती तर पक्ष कुठल्या कुठे गेला असता. अजूनही वेळ गेलेली नाही. आपण तुझे नाव बदलून जंगलप्रसाद बोडा ठेवू आणि तुझा मोदी आणि शहांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात गृहप्रवेश करू. एकदा तू आमच्यात आला आणि आमचा झालास की तुला कमळाचे पंख फुटतील आणि तू देश-विदेशात कुठेही भरार्‍या मारू शकशील. एक नवा उद्योगपती पक्षाला लाभेल. पक्ष शहांसारखा मजबूत होईल. दाढीवाल्यांच्या मनात आले तर तुला ते एका क्षणात सूक्ष्म नव्हे तर अतिविशाल खात्याचा कॅबिनेट मंत्री करतील. जास्तच डोईजड झालास तर एखाद्या राज्याचा राज्यपालही करतील.
आमच्या पक्षाच्या नव्या आदेशानुसार राज्यपाल हायकोर्टाने दिलेल्या सूचनाही फेटाळू शकतो किंवा सगळे नियम धाब्यावर बसवून हवी तशी मनमानी करू शकतो. कोणत्या व्यवसायातल्या माणसांपासून नटनट्या व एक्स्ट्रापर्यंत कोणालाही भेटू शकतो. त्यांना वेळकाळाची मर्यादा नसते. अगदी मध्यरात्री, पहाटे केव्हाही कुणाचाही शपथविधी समारंभ उरकू शकतो. मोरापासून कुत्र्यापर्यंत कोणतेही पक्षी-प्राणी पाळू शकतो… तुझी इच्छा असेल तर तसेही सांग, म्हणजे तू कुणाच्याही अध्यात मध्यात राहणार नाहीस. त्यावर मी आळीमिळी गुपचिळी घेतली. मला फक्त ईडीवाल्यांनी घरावर धाड टाकून ताब्यात घेतले आणि सर्व मीडियामध्ये माझ्या नावाच्या चर्चेला उधाण आले आहे, एवढेच पाहिजे होते. त्यामुळे चॅनलवर बातम्या, चर्चा, क्रिया, प्रतिक्रिया-उत्तरक्रिया झळकल्या असत्या आणि मला दाऊदपेक्षाही जास्त प्रसिद्धी मिळाली असती.
कारण आजकाल प्रसिद्धीशिवाय मजा नाही. कोणाही सोम्यागोम्याला साधा चाळीतला पक्षप्रमुख झाला म्हणून वारेमाप प्रसिद्धी मिळते. त्याचे बॅनरवर फोटो काय झळकतात आणि गल्लीत कॉलर ताठ करून काय चालता येते. त्यामानाने आमचे बरे. एवढे असूनसुद्धा आम्ही काहीच नसल्यासारखे वागतो. आमच्या पोक्याचा स्वभावसुद्धा अगदी माझ्यासारखाच. कुठेही फार चमकोगिरी करणार नाही. आपले काम बरे की आपण बरे. त्याला तर पैसे कमावण्याच्या कितीतरी संधी अनेक राजकीय पक्षांकडून आल्या होत्या पण त्याने त्या नाकारल्या. तो फक्त माझ्याशी प्रामाणिक आहे. तोच माझा खरा प्रâेंड आणि फिलॉसॉफर आहे. सतत माझी संकटात आणि सुखातही पाठराखण करत असतो.
तेवढ्यात माझा मानलेला परममित्र पोक्या मला नास्त्याला इडली डोसा घेऊन आला. म्हणाला, ईडीच्या कार्यालयात एकदा गेलास की आठ-आठ तास चौकशी चालते, तिथे तुला खायला मिळेल की नाही याची शंका वाटते. पण एकदा त्यांना तू तिरकिट भूमय्याचा माणूस आहेस हे समजले की मग काळजी नको. मग तुला हवे ते तू मागवू शकतोस. उलट तुझ्या फेव्हरमध्ये येणारेच प्रश्न ते विचारतील. ती प्रश्नावलीही मला तिरकिट भूमय्याने दिली आहे. हा सगळा तपास अतिशय गुप्त असतो. बंद दाराआड नक्की काय चालले आहे हेही कळत नाही. त्यामुळे तू काळजी करू नकोस. नोटबंदीच्या काळात तू बजावलेली कामगिरी कमळाची कोमेजलेली फुले विसरली असली तरी देठ विसरलेले नाहीत. ते तुझी सर्वतोपरी योग्य व्यवस्था करतील. शेवटी तू तर चिखलातून उमललेले कमळ आहेस, याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. तू ईडीच्या कोठडीत गेल्यावर तुझी काय अवस्था होईल याची काळजी मला असली तरी योग्य फील्डिंग लावल्यावर तुझी भारतासारखी टिक-ट्वेंटी होणार नाही.
त्यामुळे मी आता निश्चिंत आहे. लवकरच सर्वांना टोक्याची ईडी चौकशीसाठी उचलबांगडी ही बातमी सर्वांना ऐकायला मिळेल याची मला खात्री आहे.

Previous Post

धाडस?

Next Post

गर्वाचे घर वरच!

Next Post

गर्वाचे घर वरच!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.