१९५० साली वयाची चाळिशी उलटल्यानंतर कॅथरिन कुकसनने लिखाणाला सुरुवात केली. १९९८च्या जून महिन्यात वयाच्या ९२व्या वर्षी तिचं निधन झालं. या काळात तिच्या एकूण ९७ कादंबर्या प्रकाशित झाल्या. आपल्या लेखनसामर्थ्याच्या जोरावर तिने लाखो पौंड कमावले. लाखो पौंड विविध सेवाभावी संस्था, इस्पितळे, शिक्षणसंस्था ह्यांना दान केले.
लेखनातून तिला मिळणारं उत्पन्न एवढं होतं की तिच्या कर सल्लागाराने तिला सांगितलं की तिने स्वित्झर्लंड वा अन्य देशाचं नागरिकत्व स्वीकारावं जेणेकरून तिला एवढा कर भरावा लागणार नाही. कॅथरीनने तो सल्ला फेटाळून लावला. कर भरावा लागला तरी चालेल पण इंग्लडचं नागरिकत्व मी सोडणार नाही अशी भूमिका तिने घेतली.
अखेरच्या दिवसांत ती इस्पितळात होती. तिच्यावरील उपचारासासाठी लागणारं एक उपकरण वा यंत्र त्या इस्पितळात नव्हतं. इंग्लडमधल्या कोणत्याही इस्पितळात ते नव्हतं. म्हणून तुम्ही अमेरिकेला जा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला. कॅथरीनने सदर यंत्राची किंमत विचारली. आणि ते इस्पितळाला दान केलं. आपल्याकडे? अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आणि आता भारतरत्न सचिन तेंडुलकर. निर्लज्ज राष्ट्रवादी असण्याचे नमुने पेश करत आहेत.