• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

सांडपाण्यावर बहरला निसर्ग

- प्रशांत सिनकर

टीम मार्मिक by टीम मार्मिक
September 30, 2021
in भाष्य
0
सांडपाण्यावर बहरला निसर्ग

ही रीडबेड सिस्टीम नुसतेच सांडपाणी शुद्ध करत नाही तर तिची रचना एखाद्या सुंदर बगीचासारखी केलेली आहे. या पाण्यावरच्या बगिच्यात अनेक फुलझाडे, फळझाडे औषधी वनस्पती इत्यादी वाढत आहेत. एकूण सत्तरहून अधिक जातींच्या वनस्पतींची जवळजवळ दहा हजार रोपे येथे सुरुवातीला लावण्यात आली. सहा महिन्यात त्यांची संख्या आणि आकार वाढून संपूर्ण बाग आच्छादली गेली आहे.
—-

एखाद्या प्रदेशात मुबलक पाऊस पडूनदेखील अनेकदा पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. पावसाचे दिवस सोडले तर इतर दिवसांत धरणाचे पाणी माणसाबरोबर त्याने निर्माण केलेल्या सृष्टीची तहान भागवते. स्वत:च्या वापराबरोबर बागबगीचे, स्वच्छता आदी अनेक कारणांसाठी पिण्याच्या पाण्याचा सर्रास वापर आपण करत असतो. जिथे मुबलक पाणी मिळते त्या ठिकाणी पाण्याबाबत निष्काळजीपणा करून गरज नसताना हजारो लिटर पाणी सांडपाण्याच्या स्वरूपात गटारात जाऊन पुढे ते समुद्र-खाडी-नदी-नाले किंवा तलावात मिसळून जलप्रदूषणासाठी कारणीभूत ठरत आहे. गेल्या अनेक वर्षांत अशा प्रदूषित पाण्याने निसर्गाची मोठी हानी होते. मात्र यात काही बदल करण्यात कोणालाही फारसं स्वारस्य नसतं. विशेषकरून पिण्याचं पाणी जिथे नळ उघडताच मुबलक प्रमाणात मिळतं, अशा शहरी भागांत पाण्याचा काटकसरीने, न्यायपूर्ण पद्धतीने वापर करण्याचं गांभीर्य फारसं कोणाला नसतं. हवा तसा पाण्याचा उपसा करून पिण्याच्या पाण्याचं सांडपाण्यात रूपांतर करण्यात हे भाग आघाडीवर असतात. परंतु असं लाखो लिटर वाहून जाणारं सांडपाणी शुद्ध करून पुन्हा वापरात आणलं तर?
नाशिकमधील पोलीस अकादमीमधील विद्यार्थ्यांची वसतिगृहे आणि भोजनालयातील निर्माण होणारे किमान दोन लाख लिटर सांडपाणी नंदिनी नदीत मिसळून जलप्रदूषणाचा धोका निर्माण झाला होता. डोंबिवलीतील जेष्ठ जलतज्ञ डॉ. अजित गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली अकादमीचे सांडपाणी आता रीड बेड (वेळूबन) प्रकल्पात आणून, नैसर्गिक पद्धतीने शुद्ध केलं जातं आहे. या पाण्याचा वापर हरित पट्टे, बागबगीचे, भाजीपाला, कारंजे आदींसाठी केला जात असून महाराष्ट्रात सरकारी खात्यात राबवलेल्या या पहिल्याच प्रकल्पाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतंच कौतुक केलं आहे.
शहरात लोकवस्त्या वाढत असून ग्रामीण भागातही शहरीकरणाचे वारे वाहू लागले आहेत. मुंबई-ठाणे-पुणे-नाशिकसारख्या शहराचा विचार केला तर आज अनेक समस्यांचा पाढा डोळ्यासमोर उभा ठाकतो. पाणी ही एकच गोष्ट अशी आहे की शहरांत तिच्याबाबत कोणी फारसं गंभीर नाही. मात्र, पुढच्या २५ वर्षांत पाण्याचा प्रश्न अधिक जटिल होण्याचा धोका संभवतो. पिण्याचे पाणी जपून वापरा असे सांगून देखील चांगल्या पाण्याचा वायफळ वापर करतो. रोजच कोट्यवधी लिटर सांडपाणी नदी-नाले-खाडी-समुद्रात मिसळून जलप्रदूषणास खतपाणी आपणच घालतो आहोत. परंतु, पाण्याचं योग्य नियोजन आणि पुनर्वापर केल्यावर मोठा फायदा होतो, हे नाशिक त्र्यंबक रोड पोलीस अकादमीत पहायला मिळते आहे.
रेडबीड (वेळूबन) प्रक्रिया कशी होते?
अकादमीतील भोजनालयं, शौचालये, स्नानगृहे यांच्यातलं आणि कपडे धुण्याचं वगैरे सर्व सांडपाणी गटारांतून नदीत जात होतं. परंतु अकादमीने पुढाकार घेऊन, नॅचरल सोल्युशन्सचे ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ. अजित गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम विभाग, सोनजे कन्स्ट्रक्शन्स आणि बाबजी कन्स्ट्रक्शन्स यांच्या मदतीने रीड बेड प्रकल्पाला मूर्तरूप दिलं आहे. अकादमीच्या १५२ एकरच्या विस्तीर्ण परिसरातील एका बाजूच्या उतारावर हे सांडपाणी निर्माण होते. ते उतारावरून पंप-मोटरीविना प्रवाहित करून एका ठिकाणी आणले जाते. तिथे त्याला एनरोबिक जिवाणूंच्या मदतीने, अनेक कप्पे असलेल्या एका मोठ्या टाकीमध्ये काही प्रमाणात स्थिर व शुद्ध केले जाते. येथून ते पाणी साधारण दोन ते अडीच हजार चौरस मीटर आकाराच्या आणि अडीच ते तीन मीटर खोलीच्या रीड बेड सिस्टीममध्ये नेले जाते. येथे इनलेट चेंबरमधून सच्छिद्र पाइपाने ते पाणी दगड-विटा-खडी-वाळू आणि माती अशा थरांनी केलेल्या गाळणीमधून पाठवले जाते. तेथून ते आउटलेट चेंबरमध्ये इतर सच्छिद्र पाईपांनी एकत्र केले जाते. आणि तेथून पॉलिशिंग पाँड येथे नेले जाते. हे सर्व काम पम्प-मोटर विना किंवा कुठलीही बाह्य ऊर्जा खर्च न करता होते. या पद्धतीमध्ये विविध प्रकारच्या विशिष्ट अनुकूलित वनस्पती, एकमेकांच्या सहकार्याने नीट वाढतील अशा पद्धतीने लावल्या जातात. त्यांच्या मुळांचे घनदाट जाळे जमिनीखाली तयार होते. या वनस्पती लावण्याआधी, या गाळणीमध्ये विविध प्रकारचे अनुकूलित जिवाणू, मित्र बुरशी आणि चांगल्या मातीतील गांडुळे व तत्सम जीव सोडले जातात. या जिवांच्या चयापचयासाठी, सांडपाण्यातील अशुद्धींचा वापर होतो तर त्या जीवाणूंच्या श्वसनासाठी या वनस्पती मदत करतात.
सांडपाण्यातील अमोनियाचे नायट्रेटमध्ये रूपांतर करून ते वनस्पती वापरतात. तसेच हायड्रोजन सल्फाइडचे सल्फेटमध्ये रूपांतर करून त्याचाही वापर वनस्पतींमध्ये अथवा गाळणीमध्ये स्थिरीकरणासाठी होतो. फॉस्फेट, कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न, बोरॉन, कॉपर, झिंक, मॉलिब्डेनम इत्यादी पोषकद्रव्ये वनस्पतींच्या वाढीसाठी वापरली जातात.
ही रीडबेड सिस्टीम नुसतेच सांडपाणी शुद्ध करत नाही तर तिची रचना एखाद्या सुंदर बगीचासारखी केलेली आहे. या पाण्यावरच्या बगिच्यात अनेक फुलझाडे, फळझाडे औषधी वनस्पती इत्यादी वाढत आहेत. एकूण सत्तरहून अधिक जातींच्या वनस्पतींची जवळजवळ दहा हजार रोपे येथे सुरुवातीला लावण्यात आली. सहा महिन्यात त्यांची संख्या आणि आकार वाढून संपूर्ण बाग आच्छादली गेली आहे.
चार ठिकाणी पाण्याची छोटी कृत्रिम तळीही करण्यात आली आहेत. ज्यात विविध पाणवनस्पती कुमुदिनी आणि कमळेही जोपासण्यात आली आहेत. या तळ्यांमध्ये मासेही सोडले आहेत, जेणेकरून पाणी शुद्धीकरणास मदत होते आणि पाण्याच्या शुद्धतेची सातत्याने पडताळणी होत राहते. मासे जिवंत आहेत याचा अर्थ शुद्धीकरणाची व्यवस्था व्यवस्थित चालते आहे. यामुळे अशा प्रकारच्या सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाच्या शुद्धीकृत पाण्याच्या चाचणी करता रासायनिक प्रयोगशाळांवर अवलंबून रहावे लागत नाही. तसेच त्या रासायनिक चाचण्यांस लागणार्‍या विलंबाचा कुठला त्रास होत नाही. सदर सांडपाणी बगीच्याच्या किमान अडीच ते तीन फूट खालून वाहते.. त्या सांडपाण्यामध्ये डास-माशा आणि इतर उपद्रवी जीवजंतू वाढत नाहीत. संपूर्ण बागभर फेरफटका मारला तरी कुठलाही त्रास होत नाही. या बगीच्याची रचना करताना त्यात चालण्यासाठी काही पाऊल वाटाही बनवल्या आहेत. या पाऊलवाटा इंग्रजी ८ अशा आकाराच्या आहेत. त्यावर चालण्याने आरोग्यास फायदा होतो असे अनेक वैकल्पिक आरोग्य पद्धतींच्या उपचारकांचे मत आहे. या रीडबेडवर वाढलेल्या अनेकानेक वनस्पती, विविध प्रकारच्या मधमाशा, भुंगे, फुलपाखरे, चतुर आणि पक्षी यांना आहार निवारा आणि संरक्षण देत आहेत. पक्षांनी या झाडीमध्ये घरटीही बांधली आहेत. यामुळे ही नुसती सांडपाणी प्रक्रिया न राहता या स्थळाचे जैवविविधता जोपासणार्‍या स्थानामध्ये रूपांतर झाले आहे. ही एक प्रकारची स्वच्छता देवराई आहे.
या राईत विविध जातीच्या फुलोर्‍यापासून मध गोळा करणार्‍या देशी तसेच विदेशी मधमाशांची योजना एमपीए आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेली आल्याची माहिती जलमित्र अक्षय खोत यांनी दिली. शुद्ध केलेल्या पाण्याचे कारंजे उडताना मनाला आनंद मिळतो. पाण्यातील अधिक प्राणवायूने शुद्ध केलेले पाणी एमपीएच्या विविध भागातील हरित पट्टे आणि बागांसाठी वापरले जाते. म्हणजेच आता पोलीस अकादमी सिंचनाच्या गरजेसाठी महापालिकेचे पिण्याचे पाणी वापरत नाही. यामुळे पिण्याच्या पाण्याची साधारण दीड ते पावणे दोन लाख लिटरची दररोज बचत होत आहे. शुद्धीकरण केलेल्या पाण्यातील समतोल अन्नद्रव्यांमुळे हरित पट्ट्यांमधील वनस्पती अतिशय सुदृढ वाढत आहेत. काही भागांमध्ये विविध प्रकारच्या भाजीपाल्याची सुद्धा लागवड केलेली आहे. तसेच अनेक वृक्षजातींच्या वनस्पतींची ही लागवड केलेली आहे. एकंदरीत हा प्रकल्प निसर्गस्नेही, मनुष्य स्नेही, ऊर्जास्नेही असा आहे.

– प्रशांत सिनकर

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि पर्यावरण अभ्यासक आहेत.)

Previous Post

सी. टी. रवीअण्णांची डीएनए चाचणी

Next Post

इमानतळ चालू होतलो…

Related Posts

भाष्य

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025
भाष्य

सोमीताईचा सल्ला

May 15, 2025
भाष्य

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025
भाष्य

‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

May 8, 2025
Next Post

इमानतळ चालू होतलो...

सोनाली नवांगुळबरोबर माध्यान्हीचा पाऊण तास

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.