शिवसेनेला अकारण डिवचलं की काय होतं, याचा धडा नुकताच भारतीय जनता पक्षाला मिळाला. नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी अशिष्ट आणि असंस्कृत उद्गार काढले आणि शिवसैनिकांच्या संतापाचा कडेलोट झाला. राज्यावरच नव्हे तर देशावर कोरोनाचं संकट आहे, मुख्यमंत्री त्याची धीरोदात्तपणे हाताळणी करत आहेत, भाजपच्या कुरापतींकडे दुर्लक्ष करत राहिलं पाहिजे, संयम पाळला पाहिजे, ही सत्त्वपरीक्षा शिवसैनिकांनी दीड वर्षाहून अधिक काळ दिली होती. त्याला कमकुवतपणा समजण्याची घोडचूक भाजपने केली आणि शिवसेनेवर भिरकावलेला दगड आपल्या टाळक्यात आपटवून घेतला… यापुढे असला दळभद्री सुचू नये यासाठी त्यांनी बाळासाहेबांचं हे व्यंगचित्र फ्रेम करून लावून ठेवावं… सत्तेच्या मस्तीतून आलेल्या गलिच्छ टीकेची शिवसेना कशी खांडोळी करते, ते सदैव लक्षात राहील!