• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

कसा पण टाका

प्रश्न तुमचे, उत्तर हृषिकेश जोशी यांचे

हृषिकेश जोशी by हृषिकेश जोशी
June 8, 2021
in इतर
0
कसा पण टाका

शिक्षणाने माणूस शहाणा होतो की अतिशहाणा?
– सुदाम गोवर्धने, कवळापूर
हे शिक्षण घेऊन तो कुणासमोर बसला आहे त्यावर ते ठरतं.

तर्कहीन पायावर आधारलेल्या, कर्कश्श, कृत्रिम मालिका घरोघरचे प्रेक्षक चवीचवीने का पाहात असतील?
– शर्वरी कारखानीस, शेगाव
आपल्या घराबरोबरच शेजार बाजार, आप्तेष्ट, नातेवाईक यांची त्याला त्या त्या मालिकांत काहींच्या बाही वाढवलेली एन्लार्ज कॉपी, जी वास्तव आहे असं वाटत राहतं म्हणून.

सोशल मीडियाची कोंबडी झाकून लोकांच्या असंतोषाचा सूर्य उगवणं थांबवता येईल काय?
– सुधाकर पंचरत्ने, श्रीरामपूर
सूर्योदय डिजिटली उगवतो असं मानणार्‍यांचं कोंबडंही डिजिटलच असतं.

तुमच्या मते कोणती चांगली?- फुकटची, दीडशेवाली, पाचशेवाली, नऊशेवाली की बाराशेवाली?… कोरोनाची लस वो!
– महेश मिस्कीन, विजापूर
चटकन मिळेल ती घ्या आणि मोकळे व्हा.

गोंधळ सावळा असतो, वाईट पैसा काळा असतो, माणसाच्या मनातही काही वाईट विचार असतील तर ते काळंबेरं असतं- हाही भाषेतला वर्णवर्चस्ववादच नाही का?
– सुमिता नाडकर्णी, माहीम
कोणतेही संदर्भ कुठेही लावण्यातून होणारे कलह हे गोल डब्यात चोकोनी डबा फिट करण्याच्या प्रयत्नासारखेच असतात. मग याच नियमाने, एखाद्याचा भीतीने पडलेला पांढरा चेहरा, किंवा पराभवासाठी किंवा माघारीसाठीचे पांढरे निशाण या पांढर्‍या रंगाचं काय करायचं? विषप्रयोगाने निळा, रोगाने पिवळा, आगीने लाल, बुरशीने हिरवा, कीड लागल्याने काळा या रंगांना निसर्गनियमातच बघूया. त्यांना संदर्भ द्यायला जाऊ नये.

पावसाळा आला की तुम्हाला कशाची आठवण होते? एका छत्रीत दोघांनी अर्धं अर्धं भिजण्याची, मित्रांसोबत ‘रम’ण्याची की गरमागरम कांदा भजी चाखण्याची?
– रवींद्र पोखरकर, ठाणे
पावसाळा आला की एकाचवेळी कोरड्या दुष्काळाची, ओल्या दुष्काळाची, शेतीची, रस्त्यांवरच्या खड्ड्यांची, मुंबईतल्या ट्रॅफिकची आणि अस्तावस्त वाढलेल्या शहरात सुलभ नसलेल्या पब्लिकला टॉयलेटची आठवण येते.

शब्दांवाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले, या गाण्यात गोंधळ नाही वाटत का? शब्दांच्या वाचून शब्दांमधलं कळलं, इथपर्यंत ठीक आहे… पलीकडचं कसं काय कळलं बुवा!
– सुमेध सुरतवाला, पुणे
भूक, वेदना, पीडा, कळ, वात्सल्य, प्रेम, दया, क्षमा, कट, कारस्थान, राजकारण हे पलीकडलेच अर्थ आहेत. ते समजून घेण्यातच जगाचा व्यवहार चाललेला असतो.

आईच्या हातच्या स्वयंपाकाची सर इतर कोणाच्याही स्वयंपाकाला येत नाही, असं म्हणणं हा बाईला चुलीशी जखडण्याचाच प्रकार आहे, असं स्त्रीवादी म्हणतात. तुमचं मत काय?
– सोनल महाडेश्वर, कुंदापूर
मूल भुकेलेलं आहे आणि मला काही स्वयंपाकाची अजिबात आवड नाही, कारण मी स्त्रीवादी आहे, आणि मला चुलीला जखडलंय म्हणून मुलाला ‘प्रेमानं’ न भरवणारी किंवा जेवायला न घालणारी ‘आई’ मी तरी अजून फारशी कुठे पहिली नाही.

तुम्ही डावे की उजवे?
– स्वप्नील पाटसकर, सातारा
सर्वांप्रमाणेच जन्मजात माझे हृदय डाव्याच बाजूला आहे. पण माझा उजवा मेंदूही कार्यक्षम आहे. म्हणून ‘कर्तव्यात’ डावं उजवं न करता रोजच्या जगण्यात मला बॅलन्स साधता येतो. सगळ्या गोष्टी कोणत्याही एकाच दिशेला गेल्या की फक्त कोसळतातच अशी माझी अनुभवातून आलेली धारणा आहे.

मुलं हल्ली दिवसभर मोबाइल नाहीतर टॅबवर असतात. हटकलं की म्हणतात अभ्यास चालू आहेष्ठ त्यांचा अभ्यास चालू आहे की ती काहीतरी टाइमपास करतायत, हे त्यांना न हटकता कसं ओळखायचं?
– माधुरी नेने, रत्नागिरी
आता ना कसल्या परीक्षा ना कसले रिझल्ट. मग कशाला लक्ष घालताय? मुलं आनंदी आहेत का एवढंच या परिस्थितीत महत्वाचं आहे.

अभिनेत्याला स्वत:ची राजकीय, सामाजिक मतं असतील तर त्याने एखाद्या विषयावर जाहीर भूमिका घेणे योग्य की अयोग्य?
– परशुराम परब, डोंबिवली
जाहीर म्हणजे फक्त सोशल मीडिया? की स्वतंत्र लेख, पुस्तक, मुलाखत, स्वतःचा युट्यूब चॅनेल? यावर बरच अवलंबून आहे. आणि फक्त अभिनयावरच त्याचं पोट अवलंबून आहे का? आणि खरंच आपल्याला अभिनय येतो का? आणि अनेक गोष्टी गमावण्याची तयारी असेल तर जरूर व्यक्त व्हावं.

Previous Post

कसा पण टाका

Next Post

सुब्रता रॉय यांच्यावर येणार बायोपिक

Related Posts

पंचनामा

डिसीप्लिन

May 8, 2025
गावगप्पा

पानी रे पानी!

May 8, 2025
टपल्या आणि टिचक्या

टपल्या आणि टिचक्या

May 8, 2025
पंचनामा

टेक सपोर्ट नव्हे, लुटालूट!

May 5, 2025
Next Post

सुब्रता रॉय यांच्यावर येणार बायोपिक

आता ‘जीडीपी उत्सव’ होऊन जाऊ द्या!

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021
माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

September 8, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025

राशीभविष्य

May 8, 2025

करंजी : नांदी शुभशकुनाची…

May 8, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.