नवनव्या कथा, कल्पना असलेल्या मालिकाच दाखवणाऱ्या ‘फक्त मराठी’ वाहिनीवर ‘सप्तपदी मी रोज चालते’ ही दैनंदिन नवी कोरी मालिका सोमवार, २२ मार्चपासून सुरू झाली आहे. ‘साईबाबा : श्रद्धा आणि सबुरी’ या आध्यात्मिक मालिकेनंतर ‘सप्तपदी मी रोज चालते’ ही कौटुंबिक मालिका या वाहिनीवर सुरू होणार आहे. दैनंदिन मालिका तसेच विविध लोकप्रिय चित्रपटांच्या दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे या मालिकेच्या प्रोजेक्ट हेड आहेत. इतर वाहिन्यांवरील कौटुंबिक मालिकांच्या तुलनेत या मालिकेत वेगळं कथानक पहायला मिळेल, असा दावा दिग्दर्शक प्रवीण परब यांनी केला आहे. ‘टेल अ टेल मीडिया’च्या जितेंद्र गुप्ता आणि महेश तागडे यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे. या मालिकेत तृप्ती देवरे, बिपीन सुर्वे, विजय मिश्रा, स्नेहा रायकर, अखिल लाले, संजना काळे, प्राप्ती बने, वंदना वाकनीस, विपुल साळुंखे, आरती शिंदे, अमित कल्याणकर, रुपाली गायके, रणजित रणदिवे, चेतन चावडा, श्रुती पारकर, हर्षदा कर्वे, पूजा यादव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.