फ्रान्सचे अब्जाधीश उद्योजक ऑलिव्हियर दसॉ यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅन्युअल मॅक्रॉन यांनी शोक व्यक्त केला आहे. दसॉ यांच्या कंपनीनेच फायटर प्लेन राफेलची निर्मिती केली आहे.
ऑलिव्हियर दसा हे फ्रान्स संसदेचे खासदार होते. ऑलिव्हिअर दसॉ यांचे अजोबा मार्केल दसॉ यांनी दसॉ कंपनीची स्थापना केली होती. राजकारणामुळे त्यांनी आपल्या कंपनीच्या बोर्ड सदस्यातून माघार घेतली होती. 2020 साली फोर्ब्समध्ये सर्वाधिक श्रीमंतांमध्ये त्यांच्या नावाचा समावेश होता.
रविवारी सुट्टीच्या निमित्ताने दसॉ फिरण्यासाठी गेले होते, तेव्हा त्यांचे हेलिकॉप्टर क्रॅश झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. ते 69 वर्षाचे होते.
सौजन्य : दैनिक सामना