काळजाला भिडणाऱ्या नजरेने चाहत्यांनाच नव्हे, तर अवघ्या महाराष्ट्राला घायाळ करणारी अप्सरा म्हणजे सोनाली कुलकर्णी… आपले अनेकविध लुक्स ती नेहमीच सोशल मिडीया अकाउंटवरील आपल्या पेजवर शेअर करत असते. चाहत्यांनाही तिच्या सर्वच अदा मोहवून टाकतात. आताही सोनालीने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये मंगळसूत्र घातलेला फोटो दिसतो. हा फोटो पाहून प्रेक्षक आणि तिचे चाहते चकितच झाले आहेत. विशेष म्हणजे या फोटोला दिलेल्या कॅप्शनमुळे हेच चाहते थोडे भानावर आलेत. कॅप्शनमध्ये ती म्हणते, रियल लाईफ शादी अभी बाकी है.
धिस इज रिल लाईफ लुक… हे कॅप्शन देत सोनालीने हा फोटो शेअर केला आहे. अर्थात या लुकमध्येही सोनालीचा गोडवा काही कमी झालेला नाही. ती यातही खूपच सुरेख दिसतेय हे सांगणे न लगे. सोनाली कुलकर्णीने कुणाल बेनोडेकरसोबत मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये साखरपुडा केला होता. आता तिच्या चाहत्यांना तिच्या लग्नाची उत्सुकता लागून राहिली आहे.