एअरटेलने एअरटेल अॅड्स लाँच करून जाहिरात व्यवसायात प्रवेश केला आहे. एअरटेल अॅड्स एक शक्तिशाली ब्रॅण्ड एंगेजमेंट सोल्युशन आहे. वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये तसेच मोबाईल, डीटीएच आणि घरांमध्ये 320 मिलीयनहून अधिक एअरटेलचे ग्राहक आहेत. कंपनीच्या सखोल डेटा विज्ञान क्षमतेचा वापर करून एअरटेल अॅड्स ब्रँड्सना घराघरात पोहोचवणार आहे. केवळ ऑनलाईन ठसा उमटवण्याऐवजी ब्रँडच्या खर्चावर उत्तम परतावा देणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
सौजन्य : दैनिक सामना