‘सुरसपाटा’ या सिनेमात चमकलेली शरयू सोनावणे आणि रुपेश बने ही जोडी प्रेक्षकांना पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळणार आहे. ‘माशुका’ या एका नव्या कोऱ्या गाण्याच्या माध्यमातून ही जोडी पुन्हा प्रेक्षकांसमोर आली आहे. शरयू सध्या ‘प्रेम पॉयजन पंगा’ या मालिकेतून दिसतेय, तर रुपेश बने ‘डान्स प्लस फाईव्ह’ या रिअलिटी शोचा विजेता असून त्याने ‘सेंड्रीला’, ‘अतरंगी फंटर’ या चित्रपटातही काम केले आहे.
आता हे दोघे ‘माशुका’ या प्रेमगीतामधून पुन्हा दिसणार आहेत. यूट्युबवर मिलियन व्यूजचा इतिहास रचणाऱ्या कोळीवूड प्रॉडक्शन अंतर्गत हे प्रेममय गाणे येत आहे. जरा हटके अंदाजात चित्रित झालेले हे गाणे प्रेमवीरांना भुरळ घालेल यांत शंकाच नाही. संगीत दिग्दर्शक आणि सुप्रसिद्ध गायक प्रवीण कोळी यांनी या गाण्याचे दिग्दर्शन केले असून प्रवीण कोळी आणि योगिता कोळी यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत आणि या गाण्याला संगीत दिले देऊन आहे.
यापूर्वी त्यांनी ‘गोव्याच्या किनाऱ्यावर’, ‘इष्काची नौका’, ‘माझा बाप्पा’ या हिट गाण्यांना संगीत दिले आहे. गायक पुष्पक परदेशी यांनी या गाण्याला आवाज दिला आहे, तर या गाण्यातील रॅप गाणे गायक जे. सुबोध आणि रे मार्शल यांनी गायले आहे.