छान छान आणि प्रसन्न हसणारी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आगामी ‘रामसेतू’ या चित्रपटात अक्षयकुमार याच्यासोबत दिसणार आहे. लॉकडाऊननंतर अक्षय अनेक सिनेमे हातात घेताना दिसतोय. त्यापैकीच एक सिनेमा आहे ‘रामसेतू’. जॅकलीनच्या रूपात या सिनेमाला आता नायिका मिळाली आहे. जॅकलीन सध्या अक्षयसोबतच ‘बच्चन पांडे’ या सिनेमाचे शूटिंग करतेय. यापूर्वी ही जोडी ‘ब्रदर’ आणि ‘हाऊसफुल’मध्ये एकत्र दिसली होती.
अक्षयच्या ‘रामसेतू’ सिनेमाचे काम झपाट्याने पण गुप्तता बाळगून सुरू असल्याने त्याबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही. यापूर्वी काही दिवसांपूर्वी त्याने या सिनेमाचे केवळ एक पोस्टर शेअर केले होते. त्यात “पूल बांधून (सेतु) भारतीयांच्या देहभानात रामाचे आदर्श आपण जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करुया जे पिढ्यांना जोडून ठेवेल.” असे लिहिले होते. या पोस्टरमध्ये मागे प्रभू श्रीराम एक धनुष्य आणि बाण घेऊन आहेत.
जिथे लिहिलेय की, “सत्य की कल्पना?” विक्रम मल्होत्राच्या अबुडांडिया एन्टरटेन्मेंट आणि अक्षयचे केप ऑफ गुड फिल्म्स ‘रामसेतू’ सिनेमाची निर्मिती करत आहेत. अभिषेक शर्मा याचे दिग्दर्शन करत आहेत.